चंद्रपूर – नरेंद्र सोनारकर
बल्लारपूर शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी बल्लारपूर पोलीस एक्शन मोड वर असून,अनेक तलवारी आरोपींसह जप्त केल्या नंतर दोन पिस्तूल जप्त करण्यात त्यांना यश मिळाले आहे…
दि. १३ ऑकटोंबर २०२४ चे सायंकाळी कश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी, रा. फुकटनगर बामणी, बल्लारपुर, जि. चंद्रपूर याचे राहते घरी पोलिसांनी घरझडती घेतली असता एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीसारखे सिंगल बॅरल व खाली मॅगझीन असलेले ०७ एम.एम. पिस्तूल किंमत १० हजार. घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून कलम ३, २५ भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
यात आकाश बाबूराव चाफले, वय २४ वर्ष, ०२) प्रणय मारोती जुनघरे, वय २३ वर्ष, दोन्ही रा. सुब्बाई, ता. राजूरा, जि चंद्रपूर, ०३) पलविंदरसिंग चोदसिंग बावरी, रा.कन्नमनगर वार्ड, बल्लारपुर, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेवून आकाश बाबूराव चाफले याचे ताब्यातून एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीसारखे सिंगल बोअर व खाली मॅगझीन असलेले (अग०७ एम.एम. पिस्तूल किंमत २५ हजार घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून कलम ७, २७ भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाहीत एकुण चार आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे.
ही कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, श्री. दिपक साखरे सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, स.पो.नि. ए.एस. टोपले, पो.उप. निरिक्षक हुसेन शहा, स.फौ. गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर,
सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शेखर माथनकर, शरदचंद्र कारूष, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, म.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच चालक पो अंमलदार विकास खंदार, इत्याझी पो. स्टाफ यांनी अतिशय कुशलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.