Friday, November 8, 2024
Homeराज्यरामटेक खिंडसी डावा कालव्यातून चार विद्यार्थी वाहून गेल्याची धक्कादायक घटना...

रामटेक खिंडसी डावा कालव्यातून चार विद्यार्थी वाहून गेल्याची धक्कादायक घटना…

रामटेक – राजू कापसे

इंदिरा गांधी मुलांचे वसतिगृह घोटीटोक बोरी येथील 4 विद्यार्थी रामटेक खिंडसी डावा कालव्यातून चार विद्यार्थी वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे….

मंदिप अविनाश पाटील वर्ग 11वा. राहणार नागपूर,अनंत योगेश सांभारे वर्ग 7वा राहणार नागपूर ,मयंक कुणाल मेश्राम वर्ग 8वा राहणार नागपूर ,मयूर खुशाल बांगरे वर्ग 9वा राहणार नागपूर,, असे नहरात वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे..तर शोबत आणखी 4विद्यार्थी होते..

कमलेश बाळू डेबूळकर,ओम विलास कारामोरे,यश हारोडे,गणेश राजू आजनकर, या सर्व विद्यार्थी यांनी दिलेल्या माहिती नुसार शिक्षकांनी संडास चा खड्डा खोदायला मुलांना सांगितले होते.. दोन दिवसापासून विद्यार्थी संडास चा खड्डा खोदत असून आज दिनांक 14रोज सोमवारला खूप जास्त उन तापत होती..

घामाने ओले चिंब झाल्याने असातच वसतिगृहाला लागून नहर आहे.. अंगाची आग शांत होवावी म्हणून नहारा मधे आंघोळी साठी गेले असता.. वाहत्या पाण्याच्या प्रव्हाबरोबर वाहत गेले..

150 (दीडशे ), रुपयात खड्डा खोदायला शिक्षक धनराज महादुले यांनी सांगितले होते.. खड्डा जर नाही खोदले तर मारण्याची धमकी दिली होती असे बचावलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले…. पुढील अधीक तपास रामटेक पोलीस करीत आहे….

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: