Monday, January 20, 2025
HomeBreaking Newsबाळापूर | गणेश विसर्जनासाठी आलेल्या युवकाचा बुडून मृत्यू…

बाळापूर | गणेश विसर्जनासाठी आलेल्या युवकाचा बुडून मृत्यू…

बाळापूर – सुधीर कांबेकर

गणेशमुर्ती विसर्जनासाठी पारस येथून आलेल्या २७ वर्षीय युवकाचा भिकुंडनदी वरील नदिपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटणा सोमवारी सायंकाळी घडली. मृतक युवकाचे नाव सागर तायडे असे आहे दोन महिन्यांपूर्वी त्याचा भावाचाही मुंबई येथे दुदैवी मृत्यू झाला होता त्यामुळे टाकळी खोज बोळ येथील तायडे परिवारावर मोठा दुखाचा डोंगर कोसळला आहे.

प्राप्त माहिती नुसार टाकळी खोजबोळ येथील सागर माणिक तायडे (२७) हा पारस येथे नातेवाईकांकडे आला होता पारिसरातील गणेशमुर्ती विसर्जनासाठी सागर हा मित्रांसोबत भिकुंडखेड येथील नदी वरील पुलाजवळ आला होता आरती करण्यापूर्वी आंघोळ करावी यासाठी तो नदी पात्रात आंघोळ करण्यासाठी उतर ला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला

कमावता युवक गेल्याने परिवारावराचा आधार हरपला २७ वर्षीय सागर हा ८२ वर्षीय आजी सोबत राहत होता तर त्याच्या अकस्माक मृत्यूने आई वडील व पत्नी सह वृद्ध आजीचा आधार हरपला आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: