मध्यप्रदेश भोपाळ : छतरपूरच्या प्रसिद्ध बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम मोठ्या संकटात सापडला आहे. त्याच्यावर दलितांना मारहाण करून हवेत पिस्तूल फिरवल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शालिग्रामवर एससी-एसटीसह अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 11 फेब्रुवारी रोजी छतरपूर जिल्ह्यातील गारहा गावात एका लग्नात गोंधळ घातला होता.
पोलिसांनी सांगितले की, बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांचे भाऊ शालिग्राम गर्ग यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम २९४, ३२३, ५०६, ४२७ आणि एससी-एसटी कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा धाकटा भाऊ शालिग्राम याच्या हातात कट्टा आणि तोंडात सिगारेट होती. व्हिडिओमध्ये तो दलितांशी भांडताना दिसत होता.
दलित मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून बामिठा पोलिस ठाण्यात २० फेब्रुवारीला सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत. शालिग्रामने दलितांवरही अत्याचार केल्याचा आरोप आहे. या व्हिडिओच्या तपासासाठी एसपींनी एक टीमही तयार केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाने आता चांगलाच पेट घेतला आहे. पोलीस अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.