Monday, December 9, 2024
Homeगुन्हेगारीबारा वर्षीय मुलाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या..!

बारा वर्षीय मुलाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या..!

बाळापूर – सुदिरआप्पा कांबेकर

तालुक्यातील वाडेगाव येथे दिनांक 25 नोव्हेंबर रोजी दुपारी शालेय विद्यार्थी बारा वर्षीय मुलाने राहत्या घरात कळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे मिळालेल्या माहितीनुसार येथील पेटकरवाडीतील बारा वर्षीय पवन शिवहरी खंडारे वर्ग सहावीचा विद्यार्थी याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे मृतक मुलाची आई शेतातून घरी आली असता निदर्शनात आले आहे.

सदर मुलाच्या वडिलांचा वेल्डिंगचा व्यवसाय असल्याने वडील दुकानात होते तर मुलाची आई शेतातील कामावरून घरी आल्यावर सदर प्रकार आईच्या निदर्शनास आला मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली त्यावेळेस घरात कोणी नव्हते झालेल्या घटनेची माहिती बाळापुर पोलीस स्टेशन मध्ये दिली असता स्थानिक पोलीस चौकीचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे व त्यांचे सहकारी प्रशांत डोईफोडे अक्षय देशमुख अविनाश आडे व अंकुश मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

त्यावेळी झालेल्या घटनेबाबत शंका कुशंका व्यक्त होत असल्याने सहायक पोलीस निरीक्षक पंकज कांबळे यांनी श्वानपथक तसेच ठसे तज्ञ पथक यांना पाचारण करून सर्व बाजूंनी तपास केला व मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवीन्यात आला घटनेची तक्रार मृतक मुलाचे वडील शिवहरी खंडारे यांनी बाळापुर पोलीस स्टेशन येथे दिली असून आकस्मक मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: