Sunday, December 22, 2024
Homeराज्यराष्ट्रपती मूर्मु यांच्या हस्ते आ. ॲड आशिष जयस्वाल यांना उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार...

राष्ट्रपती मूर्मु यांच्या हस्ते आ. ॲड आशिष जयस्वाल यांना उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार…

रामटेक – राजु कापसे

रामटेक आपल्या मतदार संघातील जनतेच्या समस्या पोटतिडकीने सभागृहात मांडून त्या सोडविणे तसेच अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी मिळवुन विकास कामे पुर्णत्वास नेत सभागृहात दखलपात्र कामगिरी केल्याबद्दल आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांना सन २०२०-२०२१चा उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार जाहीर झाला आहे.

आज मुंबई येथील विधान भवनात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार जयस्वाल यांना वितरित करण्यात आला.

राज्याच्या विधानसभेत जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, त्याप्रश्नांचा सखोल अभ्यास, विश्लेषण पद्धती ह्या संबंधी योग्य युक्तिवाद करून सरकारला पटवून देणे, वेगवेगळ्या संसदीय आयुधांचा वापर करने. एक लोकप्रतिनिधी राज्यातील सर्वच विषयाचा अभ्यास करुन ते मांडणे प्रसंगी त्यावर शासन निर्णय करुन घेणे यासाठी फार कमी आमदारांचे नाव घेतले जाते.

त्यात प्रामुख्याने रामटेक मतदार संघाचे कार्य कुशल आ.आशिष जयस्वाल यांचा उल्लेख केला जातो. त्यामुळे या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र विधिमंडळ राष्ट्रकुल संसदीय मंडळाद्वारे दरवर्षी एका आमदाराला हा पुरस्कार दिला जातो. त्यामुळे गेल्या सहा वर्षाचा लेखाजोखा पाहता संपूर्ण पक्षातील विविध आमदाराची याकरिता निवड केली ज्यामध्ये अपक्ष आमदार म्हणून जयस्वाल यांचा समावेश आहे.

मतदार संघाच्या विकासासाठी, जनता, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन दरबारी तसेच सभागृहात आवाज उठवून त्या सोडवुन घेत मतदार संघात मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते,जादा लांबीचे रस्ते, बौध्द विहार , वाचनालये यांच्या निर्मितीसाठी तसेच गरजु घरकुल लाभार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचुन आणला.

राज्यातील सर्वात जास्त विकास निधी आ.जयस्वाल यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा करून आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी मिळविला त्याच बरोबर नैसर्गिक संकटांच्या दृष्ट चक्रात सापडलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना वारंवार शासकीय मदत मिळवून देण्याचे केलेले कार्य उल्लेखनीय आहे.

या सर्वांबरोबर विधान भवनात अधिवेशन काळात सर्व दिवस हजेरी सुध्दा लावुन अनेक प्रश्न उपस्थित करीत विशेष अशी कामगिरी केली याची दखल घेत शासनाच्या वतीने त्यांना सन २०२०-२०२१या वर्षाचा उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.आज या पुरस्कार वितरणासाठी विधान भवनात पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी देशाच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची प्रमुख उपस्थिती होती.

तर राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अंबादास दानवे, रामदास आठवले, नारायण राणे यांच्या सह विधिमंडळातील सर्व सदस्य व मंत्री उपस्थित होते.

हा माझा नाही तर माझ्या मतदार संघाच्या जनतेचा सम्मान – आमदार ॲड. आशिष जयस्वाल

रामटेक मतदार संघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला आमदार म्हणून पहिल्यांदा विधानभवनात पाठवुन काम करण्याची संधी दिली त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरवुन मी त्यांच्या समस्या सभागृहात मांडून त्या सोडविण्यासाठी माझ्या परीने कार्य करीत असताना मतदार संघात विविध विकास कामांसाठी भरघोस निधी खेचून आणून विकासाच्या माध्यमातून रामटेक मतदार संघाला राज्यात एक नवी ओळख निर्माण करून देण्याचे कार्य केले,

त्याबद्दल मायबाप जनतेने मला सलग चौथ्यांदा आमदार म्हणुन सभागृहात जाण्याची संधी दिली ,जनतेच्या याच विश्वास,प्रेमाच्या जोरावर सभागृहात कोणालाही भिडण्याची एक वेगळी ऊर्जा मिळुन त्यांच्यासाठी लढण्याचे बळ मिळाले.मी सभागृह,मतदार संघात केलेल्या कार्याची दखल घेवुन शासनाने महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते मला उत्कृष्ठ संसदपटू पुरस्कार देवुन माझा सन्मान केला.

ज्या जनतेने मला सलग चार वेळा आपला आमदार म्हणून सभागृहात पाठवुन काम करण्याची संधी दिली त्याच मुळे या पुरस्काराचा मी मानकरी होवु शकलो त्यामुळे माझा हा पुरस्कार मी माझ्या मतदार संघातील जनतेला समर्पित करत आहे..

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: