शाळाची परस बाग व सेंद्रिय भाजीपाला पाहून झाले प्रसन्न पातूर…
पातूर – निशांत गवई
पातूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद केंद्रीय आदर्श शाळा दिग्रस बु येथे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांची आकस्मिक भेट दिली असता शाळा पाहताच सर्व गावकरी व शिक्षक वृंदाचे कौतुक केले आहे.
यावेळी भेटीदरम्यान शालेय अभिलेख, राबवित असलेले उपक्रम, निपुण भारत चाचणी व पेपर्स, जॉली फोनीक मेथड , शालेय परसबाग, शालेय पोषण आहार, फुलांची बाग, शालेय परिसर तसेच प्रत्येक वर्गाला भेटून शैक्षणिक गुणवत्तेविषयी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. पहिल्या वर्गातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द फळ्यावर लिहून दिले व वाचायला लावले.
सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. पहिलीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी संविधान प्रास्ताविका तोंड पाठ म्हणून दाखवली.तसेच ग्रामपंचायत बाबत ,आभा कार्ड,गोल्डन कार्ड,आदी गावविकास बाबत विचारणा केली.सर्व पाहणीनंतर शाळेचे मुख्याध्यापक संजय बरडे तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे भरभरून कौतुक केले.
जिल्ह्यांतील अतिशय उत्कृष्ट शाळा व मेहनती शिक्षक असे उद्गार सर्व उपस्थित गावकरी यांच्या समोर काढले व सर्वांचे कौतुक केले.यावेळी पातूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी डी.एन. रूद्रकार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार, ग्रामसचीव शिवकुमार सर्जे,बंटी गावंडे, सुधाकर कराळे, पोलीस पाटील नितीन गवई, शिक्षक सुरेश कातखेडे ,वाघ,सर्व शिक्षिका,आरोग्य सेवक खंडारे,डेंडवे,आशा वर्कर अन्य अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्याने उपस्थित होते.