अकोला लोकसभा निवडणुकी साठी भाजप कडून माजी खासदार संजय धोत्रे यांचे सुपुत्र अनुपभाऊ धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आल्याने एकीकडे आनंदाचे वातावरण तर दुसरीकडे भाजप ने अकोल्यात घराणेशाहीला जपत तिकीट दिल्याने भाजप च्या एका गोटात नाराजीचा सुरु आहे. मात्र या बाबीचा विचार न करता अनुपभाऊने गावोगावी दौरे सुरु केले. अनुपभाऊ हे अत्यंत संयमी आणि शांत स्वभाव असून सहजच कोणालाही भेटतात, म्हूणनच मूर्तिजापूर येथील काही दलिंदर लोकांनी फायदा घेतला अनुपभाऊ ला आपली किती ओळख आहे हे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. हे तेच लोक आहेत ज्यांनी भाऊचे निष्ठावान सतरंज्या उचलणारे कार्यकर्ते दूर केले आणि स्वतः मस्त मजा मारत आहेत, भाऊचा आपल्या शिवाय पत्तच हालत नाही.असे लोकांना सांगतात.
मात्र हे लोक शहरात बदनाम असून त्यांना सोबत ठेवल तर भेटणारे मत भेटतील नाही. हे जर स्वताच्या वार्डात उभे झाले तर घरातले मत सुद्धा मिळणार नाहीत आणि सांगतात हा एरिया पॅक झाला तो पॅक करा लागते, असे सांगून पैसे उकळतात अश्या संधी साधू लोकांना प्रचारतून दूर ठेवा. यांना बघूनच लोकांची तळपायाची मस्तकात जाते. म्हणूनच तर शहरात भाऊचा राग केल्या जाते.यातील एक कार्यकर्ता भाऊच्या जागेवर टपून असल्याचे बोलल्या जाते.हा सुरुवातीला अनुपभाऊंचे स्वागत मोठ्या वाजगाज्याने करणार आणि माझ्याऐवढा मोठा कार्यकर्ता दुसरा कोणीच नाही असे भासवणार आणि जवळच्या पत्रकाराला याची बातमी करायला लावणार. मात्र याच पठ्याने भाऊंचे खास कार्यकर्ते दूर केले आणि स्वतः भाऊच्या जवळ झाला आणि भाऊंही कच्च्या कानाचा असल्याने याच सर्व ऐकून घेतो आणि याचंच ऐकूण दुसऱ्या कार्यकर्त्याला वागणूक देतो.
या सर्व संधी साधू कार्यकर्त्यांना भाऊने मोठ केल त्यांना ठेकेदार बनवलं, कोणी आधीच होते, या पाच वर्षात यांनी मोठी बिल्डिंग उंच केली तेवढं भाऊच नाव खराब केलं, हे भाऊला ज्ञान शिकवतात आणि निवडणुकीची रणनीती ठरवतात स्वतः मात्र दोन चार,पक्षात राहून भाऊच्या पायाशी आले. ही लोकसभा विधान सभेची चाचणी परीक्षा असून आपल्या भागातून भाजपाला किती मतदान मिळणार आहे यावर पक्ष निरीक्षकाचे लक्ष असणार आहे. हे चार पाच दलिंदर कोण आहेत हे भाजपच्या सच्चा कार्यकत्याला चांगलेच ठावूक आहे. तर अनुपभाऊंनी निवडणुकीच्या प्रचाराला या कार्यकर्त्यांना सोबत ठेवू नये अशी भाजप च्या सच्च्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे.