Thursday, December 26, 2024
Homeकृषीवाघाच्या हल्ल्यात पून्हा शेतकऱ्याचा मृत्यु...शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद करावे काय..?

वाघाच्या हल्ल्यात पून्हा शेतकऱ्याचा मृत्यु…शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद करावे काय..?

रामटेक – राजु कापसे

शेतात घरच्या गाई म्हैशी चारायला गेलेल्या शेतकऱ्यांवर आज वाघाने हल्ला केला त्यात नवेगाव (वडांबा) येथील शेतकरी धनराज मनिराम नैताम वय ५३ असे आहे. त्यामुळे शेतकऱ्याना शेतात जायचे नाही काय असा प्रश्न निर्माण झाला.ही घटना आज दुपारी चारचे दरम्यान नवेगाव बीट क्र २७६ मध्ये घडली.

याबाबत माहीती अशी की, वनपरीक्षेत्रांतर्गत नवेगाव बीट मध्ये नवेगाव (वडांबा) येथील रहिवासी शेतकरी धनराज मनिराम नैताम हे स्वत:च्या घरचे गुरे घेवून गावातगतच अवध्या हाकेच्या अंतरावर २०० ते ३०० मिटरवर शेतालगत गुरे घेवून गेले असता त्यांचेवर हल्ला करून जखमी केले. त्यात त्यांचा घटना स्थळीच मृत्यु झाला घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेतली जखमीला देवलापारच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.

घटनेनंतर मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच वनपरीक्षेत्र अधिकारी ऋषीकेश पाटील व देवलापारचे ठाणेदार राजेश पाटील आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पाेहचून परीस्थीती पाहिली. पंचनामा केला. प्रेत उत्तरीय तपासनी करीता ग्रामिण रुग्णालयात ठेवण्यात आले.

अर्धी तासातच केली म्हैसीची शिकार
या वाघाने धनराज यांच्या हल्ला केल्याने त्यांची जनावरे भयभीत होवून पळाली त्यामुळे त्या वाघाला शिकार करता आली नाही. त्यामुळे त्याने त्याच परीसरातील जूनेवानी रस्त्यावर वडांबा येथील रहिवासी शंकर बावीसताले यांची म्हैस मारली.

वाघांचा बंदोबस्त कसा होणार
या भागात मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या वाढलेली आहे.त्यामुळे नागरीकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वाघ हे लगतच्या कोर एरीयातील असून जंगल सफारीने त्रस्त झालेले वाघ या भागात येत असून त्यामुळे ही परिस्थीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जंगल सफारीच्या नावावर हजारोंची लुट करणाऱ्या वनविभागाने महसुल कमावने बंद करून नागरीकांच्या जिवाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: