रामटेक – राजु कापसे
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नागपूर द्वारे जादुटोणा विरोधी कायद्याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण घेतल्यानंतर रामटेक तालुक्यातील समस्त अंगणवाडी सेविकांनी निर्धार केला की गावात जनजागृती करुन अंधश्रद्धा व बुवाबाजी ला हद्दपार करण्यात येईल व कोणताही बुवा बाबा निदर्शनास आल्यास त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात येईल.
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी नागपूर यांचे आदेशानुसार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य रामभाऊ डोंगरे व त्यांची संपूर्ण टीम पंचायत समिती रामटेक येथील सभागृहात जादुटोणा विरोधी कायद्याचे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण देत होते.
सहा.गटविकास अधिकारी एम एफ भूजाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला रमेश जी कोळपे तहसीलदार रामटेक तालुका प्रमुख पाहुणे म्हणून तर मंचावर राज्य का. सदस्य रामभाऊ डोंगरे, कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे व देवानंद बडगे, जिल्हा प्रधान सचिव प्रा.डॉ सुनिल भगत व कल्पना लोखंडे व जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रशेखर मेश्राम तसेच शाखा रामटेक च्या कार्याध्यक्षा कांचनमाला माकडे उपस्थित होत्या.
पाहुण्यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व मां जिजाऊ यांच्या छायाचित्रांना पुष्पहार व दिप प्रज्वलन करण्यात आले. तद्नंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन चंद्रशेखर मेश्राम जिल्हा पदाधिकारी यांनी करुन कार्यक्रमाला शुरुवात केली. कार्यक्रमाचे उद्घाटन रमेश जी कोळपे तहसीलदार रामटेक तालुका यांनी ‘पाण्याचा दिवा’ पेटवून करताच समस्त अंगणवाडी सेविकांना आश्चर्याचा धक्काच बसला. पाण्याने दिवा पेटूच शकत नाही म्हणणाऱ्या सेविका थक्कच झाल्या. त्यानंतर जादूटोणा विरोधी कायदा म्हणजे काय, त्यांची सर्व कलमें व त्याची अंमलबजावणी कशी करावी याची विस्तृत माहिती प्रा.डॉ.सुनिल भगत यांनी सादर केली.
चमत्काराचे सादरीकरण करताना देवानंद बडगे व रामभाऊ डोंगरे यांनी बुवाबाजी चे कसब वापरून पैशाचा पाऊस पाडणे, मंत्राने हवण पेटवीणे, लोखंडी लंगर सोडवणे , नद्याचे पाणी मंत्राने बोलवीणे व उदबत्ती लावून भूत पिशाच्च आमंत्रित करणे ईत्यादी चमत्कार सादरीकरण पाहून तर अंगणवाडी सेविका अक्षरशः मंत्रमुग्धच झाल्या. पण नंतर या हातचलाखी मागचं खरं वैज्ञानिक कारणांचा उलगडा केल्या वर सेविकांनी समाधानाचा सुस्कारा सोडला.
अंगणवाडी सेविकांची खुप मोठी संख्या असल्यामुळे दोन सत्रात हे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रथम सत्र सकाळी 10.30 तर दुसरे सत्र 2.00 वाजता . कार्यक्रमाचे व्यवस्थापन जानकी नान्हे, विस्तार अधिकारी यांनी पार पाडले. दोन्ही सत्राचे संचालन कार्याध्यक्ष चित्तरंजन चौरे यांनी तर आभार पर्यवेक्षिका एस डी चंद्रिकापुरे यांनी मानले. कार्यक्रमाला पहिल्या सत्रात 102 तर दुसऱ्या सत्रात 86 अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.पर्यवेक्षिका आर डी कांबळे,माया पाटील,दिपा हुमने,प्रेरणा ढोले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.