Thursday, September 12, 2024
spot_img
HomeBreaking Newsमानोरा तालुक्यातील आमगव्हाण येथील ग्रामसेवकांसह चौघांना लाच घेताना रंगेहात पकडले...वाशीम ACB ची...

मानोरा तालुक्यातील आमगव्हाण येथील ग्रामसेवकांसह चौघांना लाच घेताना रंगेहात पकडले…वाशीम ACB ची धडाकेबाज कारवाई…

वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील आमगव्हाण येथील ग्रामसेवकांसह चौघांना लाच घेताना रंगेहात पकडले.1) राजेश विठ्ठलराव ठाकरे, वय 57 वर्षे, पद ग्राम सेवक, ग्रामपंचायत आमगव्हाण,रा.मंगरुळपीर जि.वाशिम 2) देविदास ऊर्फ दयाराम चरणदास मेहळा (मेहल्डे) वय 63 वर्षे, व्यवसाय मजुरी, (खाजगी ईसम तथा सरपंच सासरे) 3) सतिश देविदास मेहळा वय 31 वर्ष,व्यवसाय मजुरी (खाजगी ईसम तथा सरपंच पती) 4) देवेंद्र भिमराव कानोडे वय 39 वर्षे, व्यवसाय शेती, उपसरपंच-ग्रामपंचायत आमगव्हाण असे पकडण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. ग्रामसेवक व्यतिरिक्त आरोपी क्र.2 ते 4 रा.आमगव्हाण ता.मानोरा जि.वाशिम येथील रहिवाशी.

ACB वाशीम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.05/07/2024 रोजी पडताळणी कारवाई दरम्यान यातील 59 वर्षीय तक्रारदार यांना यातील आलोसे क्र.1 यांनी आरोपी क्र 2 सतीश मेहळा यांनी तक्रारदार यांचे विरुध्द केलेली ग्रामपंचायत चे नमुना नं 10पावती पुस्तकात कर वसुली करून ग्रामपंचायत ला जमा न करता परस्पर वसुली केल्या बाबतची तक्रार मागे घेऊन नमुना नं 10 पावती पुस्तकाबाबत चे प्रकरण मिटवून देऊन मदत करण्याकरीता सरपंच, उपसरपंच यांचे करिता 30,000/-₹ ची लाचेची मागणी केली.सदर लाच मागणीस आरोपी क्र.4 यांनी प्रोत्साहन दिले. दि.08/07/2024 रोजी सापळा करवाई दरम्यान आरोपी क्र.3 सरपंच पती यांनी सदर प्रकरण मिटवण्यासाठी 10,000/-₹ स्वतः करीता वेगळे मागणी केली. तसेच आरोपी क्र.2 सरपंच सासरे यांनी 50,000/-₹ ची मागणी करून 30,000/-₹ आमगव्हाण येथे राहते घरी स्विकारले उर्वरित 20,000/-₹ आजच लगेच देण्याचे सांगितले.तक्रारदार यांचे कडून लाच रक्कम स्विकारली वरून आलोसे तसेच ईतर आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुद्ध पो.स्टे. मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सक्षम अधिकारी –
आलोसे क्र.1 यांचे
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम

सापळा व तपास अधिकारी
श्री.बालाजी तिप्पलवाड
पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि. वाशिम.

सापळा मार्गदर्शक व मदत
श्री.गजानन आर.शेळके
पोलीस उप अधीक्षक
ला.प्र. वि.वाशिम

सापळा कार्यवाही पथक-
श्री.गजानन आर.शेळके
पोलीस उप अधीक्षक
श्री.बालाजी तिप्पलवाड
पोलीस निरीक्षक,

पोउपनि दुर्गादास जाधव पोहवा नितीन टवलारकर, विनोद अवगळे, विनोद मार्कंडे ,आसिफ शेख,योगेश खोटे,रवींद्र घरत,पोना समाधान मोघाड चापोशि नाविद शेख ला.प्र.वि.वाशिम

मार्गदर्शन –
१) मा. श्री.मारोती जगताप, पोलीस अधीक्षक ,
२) मा. श्री अनिल पवार, अप्पर पोलीस अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

सर्व नागरीकांना आवाहन कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग, वाशिम पोलीस उप अधीक्षक
@दुरध्वनी क्रं – 07252 235933
@टोल फ्रि क्रं 1064
मोबाईल क्र.*9423338424

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: