अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे सराफा व्यावसायिकाची हत्या करून लुटपाट केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता, तर याप्रकरणात अमरावतीच्या ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने आरोपीला मोठया शिताफीने पकडून हत्या व लुटपाट प्रकरणात मोठा उलगडा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दि.२७/११/२०२३ रोजी फिर्यादी नामे कु. वैष्णवी संजय मांडळे वय २५ वर्षे, रा. त्रिमुर्ती नगर, तिवसायांनी पो.स्टे. तिवसा येथे तक्रार दिली की, तिचा भाऊ नामे वैशाख मांडळे हा आईला किडनी चा आजार असल्याने डायलीसीस करिता दुपारी २.०० वा. दरम्यान अमरावती येथे घेवुन गेला होता व ती स्वतः बाहेरगांवी गेली होती. घरी तीचे वडील नामे संजय मांडळे, वय ५५ वर्षे, रा. त्रिमुर्ती नगर, तिवसा हे एकटेच होते. त्यावेळी कुणीतरी अज्ञात आरोपीने घरात येवून तीचे वडीलांचे डोक्यावर कुठल्यातरी धातक शस्त्राने वार करून जिवे ठार मारले व घरातील सोने, चांदी व नगदी असा एकुण ७४,६८,०००/- रूच मुद्देमाल चोरून नेला. मृतकचे कुटूंबीय दवाखान्यातुन मधुन सायं. ०७.०० वा. दरम्यान परत आले त्यावेळी त्यांना घरी श्री. संजय मांडळे हे मृत अवस्थेत आढळुन आले त्यावरून पो.स्टे. तिवसा येथे खुनासह जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
घटनेचे गांभिर्य पाहता मा. श्री. विशाल आनंद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. मा. श्री. विक्रम साळी, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण, श्री. सचिन्द्र शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळावर तात्काळ भेटी दिल्या, मा. श्री. विशाल आंनद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा यांनी तपासाची दिशा निश्चीत करित स्था.गु.शा. व पो.स्टे. तिवसा येथील तपास पथकांना दिशानिर्देश दिले गुन्हा उघडकीस आणण्या करिता नियोजनबध्द आखणी करण्यात आली. त्याअनुषंगाने पोलीस घटनेशी निगडीत सर्व विषयांवर तपास करित होते. सर्व तपास पथक प्रत्येक बारीक-सारीक बाबींची इत्यंभुत माहीती संकलीक करित होते. त्याच बरोबर मृतकाचे नातेवाईक यांचेकडुन सुध्दा विचारपुस दरम्यान आवश्यक माहीती प्राप्त करण्यात येत होती. तसेच परिसरातील सर्व सि.सि. टी.व्ही कॅमेरे तपासण्यात आले. परिसरातील रहीवाशी तसेच मार्गावरील दुकानदार यांचे पासुन सुध्दा माहीती प्राप्त करण्यात आली.
घटनेची पार्श्वभूमी अशी की, मृतक संजय मांडळे यांचा सराफा व्यवसाय असुन तिवसा येथे मार्केट लाईन मध्ये त्यांचे दुकान आहे, काही दिवसांपुर्वी त्यांचा अपघात झाला होता त्यात त्यांना दुखापत झाल्याने त्यांनी सराफा दुकानात जाणे बंद केले होते. ते घरीच राहत होते व दुकान मुलगा नामे वैशाख हा सांभाळीत होता. मृतक संजय मांडळे हे जरी घरी राहत असले तरी ते त्यांचे ओळखीतील नेहमीचे ग्राहक यांचे सोने तारण / गहाण ठेवणे, गहाण ठेवलेले सोने सोडणे ई. सराफा व्यवहार घरून करित होते.
मागील ३-४ महीन्यांपासून मृतक यांचे घराचे नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने दररोज त्यांचेकडे ३- ४ राजकाम (गवंडी काम करणारे मजूर कामावर येत होते. सुरू असलेल्या कामकाजा मुळे सर्व मजुर व मृतक यांचे सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे मजुर त्यांचे घरात येणे-जाणे करित होते. सदर कामावरील मिस्त्री नामे रोशन दिगांबर तांबटकर, वय २५, रा. देऊरवाडा, ता.आर्वी, जि. वर्धा (आरोपी) यांची सुध्दा मृतक यांचे सोबत चांगली ओळख निर्माण झाली होती तसेच त्याची मृतकाचे मुला सोबत सुध्दा मैत्री निर्माण झाली होती,
त्यामुळे चर्चे दरम्यान त्याला मृतक हे सोमवारी घरी एकटेच असतात तसेच ते घरून सराफा व्यवसाय करतात ई: बाबत संपूर्ण माहीती होती. दि. २७ / ११ / २०२३ म्हणजेच सोमवारी मृतकाचे कुटूंबीय हे हॉस्पीटलला गेले आहेत याची त्यांने खात्री केल्यानंतर तो सायंकाळी ०६.०० वा दरम्यान तिवसा येथे दारू प्राशन करून मृतक यांचे घरी येवुन मृतक यास त्याचे झालेल्या मजुरीचे पैश्यापेक्षा अधिक पैश्याची मागणी केली, मृतक याने नकार दिल्याने आरोपी रोशन दिगांबर तांबटकर हा नाराज होवुन घराबाहेर पडला व तेथीलच खालील मजल्यावर सुरू असलेल्या बांधकामावरील कुदळीचा दांडा घेवुन परत मृतक याचेकडे वरच्या मजल्यावर आला व मृतकास सोप सुपारी खाण्यास मागीतली, मृतक याने सोप सुपारी दिली व परत पानपुडा ठेवण्या करिता वळला असता आरोपीने दरवाज्याचे बाजुने लपवुन ठेवलेल्या कु-हाडींचे दांडयाने मृतकाचे डोक्यावर मागच्या बाजुने जबरदस्त प्रहार केले, त्यात मृतक यांचा जागीच मृत्यु झाला. त्यानंतर आरोपी याने आतील बेडरूम मधील रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागीने घेवुन घटनास्थळावरून त्यांचे मोटार सायकलने निघुन गेला होता.
असे आरोपी होशन याने सांगितले आहे. गुन्हाच्या समांतर तपासा दरम्यान स्था.गु.शा. अम.ग्रा चे पथकाने आरोपी नामे रोशन दिगांबर तांबटकर, वय २५ वर्षे, रा. देऊरवाडा, ता. आर्वी, जि. वर्धा यास ताब्यात घेवुन विचारपुस केली त्याने प्रथम उडवा- उडवीचे उत्तर दिले परंतु त्यास अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने वरील प्रमाणे गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांस गुन्हयात अटक कररण्यात आली व त्याचे ताब्यातुन गुन्हयात वापरलेली दुचाकी किं. ३०,०००/ – व गुन्हयात चोरी गेलेले सोने अं. १२० ग्रॅम व नगदी १२,००० असा एकुण ७,७५,०००/- रूचा माल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हयाचा तपास पो. नि. प्रदीप ठाकुर, ठाणेदार तिवसा हे करित असुन पुढील तपासात आरोपीस विचारपुस करुन उर्वरीत मुद्देमाल जप्त करण्यत येते. सदरची कार्यवाही मा. श्री. विशाल आनंद, पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रा. मा. श्री. विक्रम साळी, अपर पोलीस अधिक्षक, अमरावती, श्री. सचिन्द्र शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात श्री. किरण वानखडे, पो. नि, स्था.गु.शा., अमरावती ग्रा. श्री. प्रदीप ठाकुर, पो. नि. तिवसा पो.उप-नि. पांडे, पो.स्टे. तिवसा तसेच स.पो.नि. सचिन पवार, पो.उप.नि. नितीन चुलपार, संजय शिंदे, मो. तस्लीम, मुलचंद भांबुरकर यांचेसह स्था. गु.शा येथील सर्व पोलीसअमलदार यांचे पथकाने केली आहे.