अमरावती : अकोला जिल्ह्यातील अकोट पोलीस कस्टडीत युवकाचे मृत्यूचे प्रकरण ताजे असताना अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील प्रकरण समोर आलंय, चांदूर रेल्वे येथील रितेश मेश्राम याचा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वॉर्ड क्रमांक 16 समोरील कोठडी वॉर्डमध्ये मृत्यू झाला असून रितेश चा मृत्यू असा कसा झाला असा प्रश्न कुटुंबाकडून केल्या जात आहे. तर रितेश मेश्राम याच्यावर ३५३ अंतर्गत सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप होता.
रितेश याचा अटक वॉरंट निघाला असल्याने त्याला तारखे आधीच चांदूर रेल्वे पोलिसांनी घरून नेले होते, पोलीस कस्टडीमध्ये असतानाच त्याची तब्बेत खालावली, त्याला उपचार करण्यासाठी अमरावतीच्या इर्विन मधील कस्टडी वार्डात उपचारासाठी भरती केले होते. मात्र त्याच्या मृत्युच्या बातमीने कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली
चांदूर रेल्वे येथील रितेश अशोक मेश्राम या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादामुळे चांदूर रेल्वे पोलिसांनी रितेशला पोलिस ठाण्यात आणले होते. याप्रकरणी रितेशला कलम 353 अंतर्गत अटक करण्यात आली होती. दोनदा कोर्टात अनुपस्थित राहिल्याने त्याच्या अटकेचे वॉरंट काढण्यात आले, तेव्हा चांदूर रेल्वे स्थानकावर रितेशची तब्येत बिघडल्याने त्याला इर्विन येथे हलवण्यात आले. रितेशच्या आईचा आरोप आहे की जेव्हा ती रितेशच्या जामिनाची कागदपत्रे घेऊन आपल्या मुलाला भेटण्यासाठी इर्विनला पोहोचली तेव्हा तिला रितेशच्या मृत्यूची बातमी मिळाली. मृत्यूची बातमी कळताच त्याच्या आईने हंबरडा फोडला.