Saturday, July 13, 2024
spot_img
Homeराज्यवाशिम | पशुसंवर्धन विभागाचा हेल्पलाइन नंबर जारी...

वाशिम | पशुसंवर्धन विभागाचा हेल्पलाइन नंबर जारी…

आजारी जनावरांवर होणार त्वरित उपचार

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

वाशिम जिल्ह्यातील पशु पशुपालकांना ऐन पेरणीच्या हंगामात दिलासा देणारा आणखी एक निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी घेतला आहे. पशुपालक शेतकऱ्यांच्या घरी जाऊन आजारी पडलेल्या पशुंवर डॉक्टरांनी योग्य उपचार करण्याच्या सूचना सीईओ वाघमारे यांनी दिल्या आहेत.

यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने हेल्पलाइन क्रमांक 82 75 86 88 00 हा जारी केला आहे. आठवड्यातील सातही दिवस सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या क्रमांकावर संपर्क केल्यास डाॅक्टर पशुपालक शेतकऱ्यां घरी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जयश्री केंद्रे यांनी दिली. जिल्ह्यामध्ये एकूण 58 पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये श्रेणी एक ची 17 आणि श्रेणी 2 ची 41 दवाखाने आहेत.

काही दवाखान्यामध्ये पशुधन विकास अधिकारी आणि सहायक पशुधन विकास अधिकारी यांची पदे रिक्त असून त्यांचा प्रभार इतर डॉक्टरांकडे देण्यात आला आहे. तरीही उपलब्ध डाॅक्टर त्यांच्या क्षमतेप्रमाणे आजारी जनावरांना घरपोच सेवा देणार आहेत.

हेल्पलाइन सेवा अशी कार्य करणार:

पशुपालकांनी हेल्पलाइन नंबर वर संपर्क केल्यास जिल्हा परिषद कक्षा मार्फत संबंधिताचे तपशील नोंदविण्यात येतील. हे तपशील संबंधित पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टर यांच्याकडे पाठवण्यात येतील. यानंतर डॉक्टर पशुपालकांशी संपर्क करून पुढील कार्यवाही करतील.

आजाराची ही लक्षणे दिसल्यास फोन करा:

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: