अमरावती : आजकाल मोबाईलचा फोटोग्राफीचा जमाना असला तरी फोटोग्राफी ही एक कला आहे. ज्याला अवगत झाली तो बादशहा. अमरावती शहरात अनेक फोटोग्राफर आहेत पण आपल्या कलेची वेगळी छाप सोडणारा एक कलाकार आहे तो म्हणजे मुकेश वानखडे. या कलाकाराने अमरावती शहरातील स्वरा नीमगावकर या ९ वर्षीय मुलीचे दिवाळी निमित्य फोटोसेशन करून आपली वेगळी ओळख निर्माण केली. या फोटोमध्ये मुकेश यांची प्रकाश योजना अप्रतिम असल्याने या फोटोला विशेष महत्व आले आहे.
यावर्षी नरक चतुर्दशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 01:57 वाजता सुरू होईल आणि 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 02:44 वाजता समाप्त होईल. या दिवशी देखावा वाढविला जातो. म्हणून याला रूप चतुर्दशी असेही म्हणतात. यासाठी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी स्नान करण्याची परंपरा आहे. अशा स्थितीत स्वराचे छायाचित्रण करून भारतीय संस्कृतीची ओळख या फोटोच्या माध्यमातून अमरावतीकरांना दाखविली…
नवे लेने भरजारी,
दारी रांगोळी न्यारी,
उटण्याचा सुगंध दरवळत,
अभंग स्नानाची वेळ झाली.