अमरावती | धामणगाव रेल्वे तालुक्यात जिल्ह्यातील नारगावंडी गावात दिनांक १६.०९.२०२० रोजी एका इसमाने तिच्या मतीमंद असल्याचा गैरफायदा घेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता त्या प्रकरणी काल अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती पी.एन.राव मॅडम यांनी आरोपी गजानन सुदामराव सरकटे याला 10 वर्ष सश्रम कारावास आणि 3 हजार रुपये दंड शी शिक्षा ठोठावण्यात आली.
मिळालेल्या माहिती नुसार, पिडीता हि मतिमंद असुन ती तिच्या आईसह जागरण गोधंळाच्या कार्यक्रमा निमित्त तिचे मामाचे गावी मौजे नारगावंडी ता. धामणगाव रेल्वे येथे दिनांक १६.०९.२०२० रोजी गेली होती. तेव्हा रात्री दिनांक १६.०९.२०२० रोजी सांयकाळी ०७.०० ते ०७.३० च्या दरम्यान आरोपी सुध्दा तिथे कार्यक्रमासाठी हजर होता. फिर्यादीची पिडीत मतिमंद मुलगी दिसून आली नाही म्हणून फिर्यादी व इतरांनी तिचा शोध घेतला असता घराच्या पाठीमागे पिडितेच्या रडण्याचा आवाज आला. त्यानंतर फिर्यादीने तिला पाहिले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे दिसून आले त्यानंतर फिर्यादीने पिडीतेस विचारपूस केली असता तिने इशाऱ्याने आरोपीचे घर दाखविले व आरोपी गजानन सरकटे याने तिच्यावर अत्याचार केल्याचे इशाऱ्याने सांगितले.
आरोपीने पिडीतेच्या मतीमंदतेचा गैरफायदा घेवून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला. त्यानंतर मतिमंद पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी विरूध्द अप क. २८८/२०२० दिनांक १७.०९.२०२० रोजी दत्तापुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात सरकारी पक्षा तर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अनुप्रिती अशोकराव ढवळे यांनी एकुण नउ साक्षीदार तपासले. फिर्यादी, पिडिता आणि वैदयकिय अधिकारी व इतर साक्षीदारांची साक्ष ग्राहय धरुन तसेच अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अनुप्रिती अशोकराव ढवळे यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन वि न्यायालय क्रमांक ५ च्या न्यायाधीश मा. श्रीमती पी. एन. राव, मॅडम यांनी आरोपीला कलम ३७६ भा.दं.वि. अन्वये १० वर्षे सश्रम कारावास व रुपये ३,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महिने अतिरीक्त साधा कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच विधी सेवाप्राधिकरण अमरावती यांना पिडीतेस मनोधैर्य योजने अंतर्गत मदत करण्याबाबत आदेशीत केले.
या प्रकरणात सरकार पक्षा तर्फे अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अनुप्रिती अशोकराव ढवळे यांनी प्रकरण चालवून यशस्वीरित्या युक्तीवाद केला. सदर प्रकरणात महत्वाचा तपास हा पोलिस उपनिरीक्षक द्वारका जी. अंभोरे व ए. पी. आय मिलींद सरकटे यांनी केला. सदरचे प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून एन. पी. सी. गजानन नागे, राजु उईके बं.न.३३९ व पो.हे.कॉ. अरुण एम. हटवार यांनी सहकार्य केले.