अमरावतीच्या कु.कणिका शर्मा या विद्यार्थिनीने वंशोदया पब्लिक स्कूल मधून 94.2% घेत प्रथम येवून आपल्या आई वडिलांसह शाळेचा बहुमान वाढविला. कणिका आपल्या यशाचे श्रेय आई वडिलांसह शिक्षकांना देते.
अमरावती शहरातील बुधवारा येथील नवीन गोकुलचंद शर्मा व पूनम नवीन शर्मा यांची लाडकी लेक कणिका शर्मा हिने महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत नेत्रदीपक यश प्राप्त करीत दहावीच्या परीक्षेत 94.2% गुण मिळविले आहे. शहरातील वंशोदया पब्लिक स्कूल या शाळेची विद्यार्थिनी असून शाळेत टॉपर आल्याने सर्व शिक्षक वृंद तिचे कौतुक करीत आहे.