अमरावती : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर असताना काँग्रेस पक्षाकडून अमरावतीचे विद्यमान आमदार सुलभा खोडके यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर पक्षविरोधी कारवाई केल्या म्हणून ही हकालपट्टी करण्यात आली आहे. सुलभा खोडके ह्या अमरावती विधानसभा 38 च्या आमदार असून त्यांचे पती हे अजित पवार गटात आहेत आणि यावेळी ते महायुतीच्या अजित पवार गटाकडून उमेदवारी मागत आहेत. आमदार श्रीमती सुलभा खोडके काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
पक्ष विरोधी कारवाया केल्याने प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशावरून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही कारवाई आहे. तर अमरावती विधानसभेत आधीच दोन्ही घटक पक्षाकडून उमेदवारीसाठी दावेदारी दाखल करत असताना आता आमदार सुलभा खोडके यांची गोची झाली आहे. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून त्यांनाच उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांचे पती संजय खोडके हे अतोनात प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांच्या पुढं आणखी मोठा पेच निर्माण झाला आहे. कारण माहिती कडून शिवसेना गटाचे नेते नानकराम नेमणानी हे सुद्धा उमेदवारी मागत आहे. दुसरे जगदीश गुप्ता हे हे सुद्धा भाजपकडून उमेदवारीसाठी रांगेत आहेत. सुलभा खोडके यांना तिकीट मिळाल्यानंतरही ही निवडणूक खूप अडचणीची ठरणार आहे.