Friday, November 8, 2024
HomeMarathi News Todayमूर्तिजापूर | तर यावेळी शहरातील 'या' रावणाचा नाश होणार आणि महिला सुटकेचा...

मूर्तिजापूर | तर यावेळी शहरातील ‘या’ रावणाचा नाश होणार आणि महिला सुटकेचा श्वास घेणार?…भाग १

मूर्तिजापूर : सध्याचं राजकारण हे वेगळ्या स्तराला जात असल्याचे आपण पाहत आहोत. तर राजकारणात महिला किती सुरक्षित आहेत? एका मोठ्या राजकीय पक्षात महिलांचे शोषण होते? असा सूर पक्षातील काही शोषित महिलांचा असून त्याचं आर्थिक शारीरिक हे शोषणासोबतच इतरही धंदे काही राजकारणी करून घेत असल्याचे धक्कादायक माहिती समोर येत आहे. महिलांना पक्षाच्या कामासाठी एकत्र करून त्यांच्याकडून दुसरेच धंदे करीत असल्याचा धक्कादायक माहिती ‘महाव्हाईस न्यूज’ च्या हाती लागली असून निवडणुकीत याचा खुलासा होणार असल्याने आता एका नेत्याची मोठी गोची होणार असल्याचे समजते. मूर्तिजापूर शहरात एक नेता हा लिंग पिसाटासारखा झाला असून याचा डोळा पक्षातील काही महिलांवर असल्याचे समजते. यापूर्वी या नेत्याने अनेक महिलांचे शोषण केल्याचे समजते. तर याचा एक खाजगी ठेकेदार त्याच्या अति जवळचा असून हा महिला पुरवण्याचे धंदे करत आहे. त्या बदल्यात ठेकेदारी करुन मोठे कंत्राट आपल्या पदरात पाडून घेत आहे. या खाजगी ठेकेदाराने त्याच्या समाजातील काही महिला त्या नेत्यापर्यंत नेल्याचीही धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन तीन महिन्या अगोदर प्रतीक नगरामध्ये एका आसाम मधून आलेल्या मुलीचा खून झाला होता तर त्या खुनाचा आरोप एका वेटरवर होता आणि तो वेटर कुठे गायब झाला? पोलीस गेल्या तीन महिन्यापासून तपास करीत आहे. मात्र पोलिसांना गुन्हेगार का सापडत नाही? मात्र त्या खुनाच्या प्रकरणात एका नेत्याचा हात असल्याचेही चर्चेला शहरात उधाण आले आहे.

महिलांचा व मुलींचा नाद असलेल्या या नेत्याला बाहेर गावावरून व्यावसायिक तरुणी शहरात आली तर सुरुवातीला याच्याकडेच नेण्यात येते. त्याच बरोबर या न्रेत्याच्या पावलावर पाऊल ठेवणारे शहरातील आणखी तीन-चार लिंग पिसाट व्यापारी सुद्धा आहेत. त्यांच्या निदर्शनात एखादी बेवारस महिला किंवा तरुणी आढळली तर ती त्या नेत्यापर्यंत ती महिला कशी जाईल याची व्यवस्था तो ठेकेदार करतो. ज्या दिवशी त्या मुलीचा हत्या झाली नेमक त्याच दिवशी तो नेता शहरात असणे संशयास्पद आहे. ती मुलगी दोन दिवसापूर्वी शहरात आली होती, शहरात आल्यानंतर तीला एका नेत्याच्या फार्म हाऊसवर नेण्यात आले होते. तिला घेऊन जाणारा हा शहरातील या नेत्याचा खास मित्र व महिला पुरवठा करणारा खाजगी ठेकेदार होता. नंतर तिला त्या ठेकेदाराने बस स्थानक चौकात सोडून दिले. त्या दिवसाचे परिसरातील सीसीटीव्ही तपासले तर सत्य घटना समोर येईल. चौकात सोडून दिल्यानंतर ती रेल्वे टेशन वर भटकत असताना हा वेटर तिच्या निदर्शनास पडला आणि दोघेही नश्या खोर असल्यामुळे दोघांची मैत्री झाली. नंतर तिने मुंबई जाण्याचा कार्यक्रम रद्द केला आणि त्या वेटर सोबत राहण्याचा प्लान बनवला. हा वेटर आधी बायपास वरील वैशाली वाईन बार येथे कामावर असल्याने पुन्हा त्यांना त्या ठिकाणी काम मागण्यासाठी येथे पोहोचला. त्यानंतर दोन दिवसांनी कामावर येण्याचे आश्वासन दिले त्यानंतर तो वैशाली वाइन बार यांच्याच मालकीचा असलेल्या घरामध्ये त्या मुलीसह राहू लागला, नंतर त्याच घरात तिचा खून झाला.

या खुनामागे त्या वेटरचा हात असल्याचं प्रथम दर्शनी लक्षात आले. मात्र तो वेटर गेल्या तीन महिन्यापासून गायब असून पोलिसांना दिसत कसा नाही किंवा सापडत कसा नाही. असा प्रश्न उपस्थित होतो. गुन्हेगार कितीही जरी मोठा असला तरी तो पोलिसापासून वाचू शकत नाही. मात्र हा गेल्या तीन महिन्यापासून पोलिसांच्या हाती कसा लागत नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. त्या मुलीचा फायदा शहरातील इतरही लोकांनी घेतला होता काय हेही तपासात पुढे येणे गरजेचे होते. शारीरिक शोषण झाल्या नंतर येथील एका नेत्याचे बिंग फुटू नये म्हणून त्यांनी या मुलीला संपवलं असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. आता हा नेता कोण आणि नेत्याबद्दल अशी अफवा का पसरवली जात आहे हे इथे महत्त्वाचे आहे. गेल्या दशकापासून या नेत्याच्या तोंडाला लाचखोरीची आणि महिलांची चटक लागल्याने पक्षातील काही महिलांचं शोषण करीत असल्याचेही समजते तर काही महिलांनी पद किंवा प्रतिष्ठेसाठी आपलं सर्वस्व यांनी त्याला देण्यासाठी तयार असतात तर या नेत्याचा हाच प्रताप नाही तर इतरही अनेक प्रताप आहे. एवढ्यात हा नेता अनेक व्यासाच्या अधीन गेला असून रोज संध्याकाळी त्याला मद्यपान करण्याची सवय जडली आहे. यासाठी विविध धंद्यात पार्टनर असलेल्या एका खास कार्यकर्त्याची निवड केली आहे. तो न चुकता योग्य त्या ठिकाणी त्याला रोज खास ब्रॅण्ड असलेला एक खंबा आणि बया पोहोचवत असल्याची माहिती विशेष सुत्रांनी दिली आहे… नेतृत्व लिंगपिसाट असेल, तर सामान्य जनता विशेषतः महिलांचे चारित्र्य आणि एकूणच भविष्य अंधःकारमय होणार नाही काय? हा संवेदनशील मनाला अंतर्मुख करणारा प्रश्न प्रत्येकालाच पडावा, असा अंधार सध्या शहरात भयाचे वातावराण निर्माण करत आहे.……उर्वरित भाग पुढील अंकात.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: