अमरावती महानगरपालिका, श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती, डिग्री कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन (बहुसंकाय स्वायत्त महाविद्यालय) अमरावती, नेहरु युवा केंद्र अमरावती, कॉलेज ऑफ इंजीनिअरींग श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, पतंजली योग केंद्र अमरावती, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व योग विभाग श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा दिनांक २१ जुन, २०२४ रोजी श्री. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथील जिन्मॅस्टीक हॉलमध्ये सकाळी ७.०० ते ८.०० या वेळात जागतिक योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.
शारीरिक, मानसिक व भावनिक तणावमुक्तीसाठी शरीर निरोगी निरामय राहण्याकरिता जागतिक योग दिवसानिमित्य सदस्य व नागरीकांनी सहभाग घेतला. मा.खासदार डॉ.अनिल बोंडे व मा.आयुक्त देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मा.खासदार डॉ.अनिल बोंडे, मा.आयुक्त देविदास पवार, योग गुरु अरुण खोडस्कर, श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे उप प्राचार्य श्री.लबळे, श्री.काळे, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, क्रीडा अधिकारी प्रविण ठाकरे, उपअभियंता नितीन बोबडे, सहा. प्रोग्रामर पंकज सपकाळ, शाळा निरीक्षक वहीद खान, योगेश पखाले, मोहम्मद जावेद, ज्योती बनसोड, प्रफुल्ल अनिलकर, मुख्याध्यापक सुधीर धोत्रे, सागर बावणे, प्रकाश सिडाम, मंजुषा कलाने, संगीता मोरे, प्रज्ञा ढंगारे, श्रीमती सावजी, सुनंदा मेहरे,
श्री हयजार सर, डाटा एन्ट्री ऑपरेटर मंगेश मेश्राम, श्री पाटबागे सर, संजय नाडे, अमरावती महानगरपालिका, श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, डिग्री कॉलेज ऑफ फिजीकल एज्युकेशन (बहुसंकाय स्वायत्त महाविद्यालय) अमरावती, नेहरु युवा केंद्र अमरावती, कॉलेज ऑफ इंजीनिअरींग श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ,
पतंजली योग केंद्र अमरावती, विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व योग विभाग श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ यांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. उपअभियंता नितीन बोबडे यांनी सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.