Friday, November 22, 2024
Homeराज्यआकोट ग्रामीण पोलिसांनी गोवंश चोरट्यांवर केला गुन्हा दाखल…दोन गोऱ्ह्यांना सोडविले…३ लक्ष १०...

आकोट ग्रामीण पोलिसांनी गोवंश चोरट्यांवर केला गुन्हा दाखल…दोन गोऱ्ह्यांना सोडविले…३ लक्ष १० हजाराचा मुद्देमाल जप्त…

आकोट – संजय आठवले

दोन गोवंश जातीच्या गोऱ्ह्यांना अमानुषतेने वागवून त्यांची कत्तल करण्याचा मानस असलेल्या दोन चोरट्यांवर आकोट ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांचे कडून ३ लक्ष १० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. घटनेची हकीगत अशी कि, दि. २५/०६/२०२३ रोजी पेट्रोलींग करीत असतांना आकोट ग्रामीण पोलीसांना गोपनिय खबर मिळाली.

त्यावरून पो. स्टॉफ व पंचासह आकोट ते हिवरखेड मार्गावरील थोरात ऍग्रो समोर नाकाबंदी करण्यात आली. सकाळी ०९.३० वा. चे सुमारास हिवरखेड रोड कडुन एक टाटा एस. क. एम. एच. ४९ डी ३५०३ येतांना दिसला. सदर गाडीस पोलिसांनी थांबवीले. वाहनाचे चालकास टाटा एस मधे असलेल्या गोवंश जातीचे गोन्हे वाहतुकीबाबत व त्याचे विक्री पावती बाबत विचारण्यात आली.

त्याने पावती नसल्याचे सांगुन सदरची गो्ऱ्हे सोबत असलेल्या साजिदउद्दिन रफिकउद्दीन वय २० वर्ष, व्यवसाय मजुरी, रा. विचारी ता. तेल्हारा, याची असल्याचे सांगितले. त्यास गोऱ्हयांबाबत विचारपुस केली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून सदर गोवंश जातीचे दोन गोऱ्हे वाहनामधे कोंबुन कत्तलीसाठी नेत असल्याची पोलिसांची खात्री झाली.

त्यावरून साजिदउद्दिन रफिकउद्दीन वय २० वर्ष व्यवसाय मजुरी रा. चिवारी ता. तेल्हारा. जि. अकोला याचे कडून दोन गोवंश जातीचे गोन्हे किं. अं. ६०,०००/- रू चे तसेच वाहन चालक अविनाश उध्दव साबळे वय २८ वर्ष, रा. पिंपळखुटा ता. आकोट जि. अकोला याचे जवळून गोवंश जातीचे गोऱ्हे वाहतुकी करिता वापरलेला एक टाटा एस क्रमांक एम एच ४९- डी- ३५०३ चे मोटर वाहन किं.अं. २,५०,०००/- रु. असा एकूण ३,१०,०००/- रु. चा मुद्देमाल पंचासमक्ष तपासकामी जप्त करण्यात आला.

तसेच दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले गेले. त्यानंतर पो.स्टे. ला सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गोऱ्ह्यांचे पालन पोषनाकरीता गौरक्षण समिती आकोट येथे दाखल करण्यात आले आहे. नमुद घटनास्थळावरून ०२ गोवंश जातीचे गोऱ्हे किं. अं. ६०,०००/- रु. चे तसेच वाहतुकी करिता वापरलेला एक टाटा एस क्रमांक एमएच ४९- डी- ३५०३ चे मोटर वाहन किं.अं. २,५०,०००/-रु. असा एकूण ३,१०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नमुद आरोपीविरुध्द पो.स्टे. आकोट ग्रामीण येथे अप.नं. २४४ / २०२३ कलम- ५ (अ), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम ११, (१) (ड) प्राण्यांना कुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अन्वये गुन्हा नोंद केला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक संदिप घुगे, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, व एस.डी.पी.ओ. रितु खोखर आकोट, परि. सहा. पोलीस अधिक्षक सुरज गुंजाळ, प्रभारी ठाणेदार पोलीस स्टेशन आकोट ग्रामीण चे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हेड. कॉ. उमेशचंद्र सोळंके, ए.एस.आय. दादाराव लिखार, पो.ना. सुधीर झटाले, पो. कॉ. उमेश दुतोंडे यांनी कार्यवाही केली.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: