Sunday, December 22, 2024
Homeराजकीयअकोल्याचा 'दादा' काळाच्या पडद्याआड...

अकोल्याचा ‘दादा’ काळाच्या पडद्याआड…

नेहमी हसतमुख असणारे अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेश सरचिटणीस श्रीकांत पिसे पाटील यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी ते 63 वर्षांचे होतेय. त्यांच्या अचानक जाण्याने अकोल्याच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली.

श्रीकांत दादा हे गेल्या दोन वर्षांपासून ते किडनीच्या आजारानं ग्रस्त होतेय. ते गेल्या काही वर्षांपासून राजकीय कामात सक्रिय नव्हते, पिसे यांनी तब्बल 15 वर्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सांभाळलं होतंय. यासोबतच पक्षाचे वर्धा, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्याचं प्रभारीपदही त्यांनी सांभाळलं होतंय.

जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना ‘दादा’ नावाने ओळखलं जायचंय. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचे ते निकटस्थ होतेय.

त्यांचा अंतिम संस्कार आज दि.15-10-2022 रोजी सकाळी 11.00 वा. पार पडतील. अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान “विमल” जवाहर नगर, अकोला येथून उमरी मोक्षधाम येथे निघेल…

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: