Sunday, July 21, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीखोटी कागदपत्रे बनवून वारांगडे गावातील कोट्यावधीची जमीन हडपली बोईसरच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा...

खोटी कागदपत्रे बनवून वारांगडे गावातील कोट्यावधीची जमीन हडपली बोईसरच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा आणखी एक घोटाळा उघडकीस…

बोगस दाखल्यांच्या आधारे कोट्यावधी रुपयांची गावठाण जागा परप्रांतीय नागरीकांना विक्री प्रकरणात जिल्हा परीषदेची चौकशी सुरू असतानाच बोईसरच्या सरपंच पदाच्या उमेदवाराचा आणखी एक करारनामा समोर आला आहे.

बोईसर जवळील वारांगडे येथील २.५ एकर जागा बनावट मृत्यूपत्र तसेच इतर खोट्या कागदपत्रांच्या आधारे आपल्या सहकार्‍याच्या नावावर हडपल्याचा गंभीर आरोप बोईसर ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवारावर मूळ जमीन मालकाच्या नातेवाईकांनी केला आहे.तलाठी सजा बेटेगाव अंतर्गत मौजे वारांगडे येथील सर्वे क्र ११३/अ,१२६ आणि १३५ मधील जवळपास २.५ एकर जागा बोईसरच्या प्रसिद्ध चित्रालय टॉकीजचे मालक आणि सेवा आश्रम विद्यालयातील शिक्षक व प्रसिद्ध लेखक भगीरथ शिवागोविंद शुक्ला यांच्या मालकीची आहे.

मात्र कोरोंना काळात टाळेबंदीचा फायदा उचलत सरपंच पदाच्या उमेदवाराने भगीरथ शुक्ला यांचे बनावट मृत्यूपत्र व त्यावरील बनावट स्वाक्षरी त्याच प्रमाणे बनावट ग्रामपंचायत दाखले यांच्या आधारे करोडो रुपयांची जमीन आपले सहकारी यांच्या नावाने करून हडपल्याचा आरोप वारसदारानी केला.

या प्रकरणी मूळ मालकाच्या वारसांना आपली जमीन हडपून त्यामध्ये सपाटीकरणाचे काम सुरू असल्याचे कळताच त्यानी तलाठी सजा बेटेगाव व मंडळ अधिकारी कार्यालय बोईसर, पालघर तहसीलदार व प्रांत कार्यालयात धाव घेऊन जमिनीचा सात बारा उतारा व इतर कागदपत्रांची पडताळणी केली असता वडीलांचे खोटे मृत्यूपत्र बनवून त्याचा वापर जमीन हडपण्यासाठी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

या नंतर जमिनीच्या मूळ मालकाच्या वारसदारांनी न्यायालयात धाव घेऊन संबंधित जमीन प्रकरणात स्थगिती आदेश आणून या जमीन घोटाळ्याशी संबंधित व्यक्तींवर न्यालायामार्फत कठोर कारवाई करण्यासाठी दावा दाखल केला आहे.

वारांगडे येथील शुक्ला परीवाराच्या जमिनीचा वाद नायालयात सुरू असून याला नायालयाने स्थगिती दिली असताना देखील जमीन हडपण्याचा प्रयत्न केलेल्या व्यक्तीने ही जमीन विकण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.

मौजे वारांगडे येथील जागा ही आमची वडीलोपार्जित असून खोट्या मृत्युपत्राच्या आधारे ती बोईसर आणि वारांगडे येथील काही इसमानी हडपली आहे.याविरोधात आम्ही मा.वरीष्ठ न्यायालयात गेलो असता संबंधित वारांगडे येथील सर्व्हे क्र.११३,१२६ व १३५ या जागेवर स्थगिती देऊन पुढील सुनावणी न्यायालयात सुरू आहे. राकेश मिश्रा मूळ जमीन मालकाचे वारसदार

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: