Monday, December 30, 2024
Homeगुन्हेगारीAkola | लिंगपिसाट आजोबाने केला नातीवर बलात्कार...आजोबासह अन्य दोघांवर गुन्हे दाखल…नात ९...

Akola | लिंगपिसाट आजोबाने केला नातीवर बलात्कार…आजोबासह अन्य दोघांवर गुन्हे दाखल…नात ९ महिन्याची गर्भवती…

Akola : अकोला जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली. दीड वर्षांपूर्वी म्हणजेच वयाच्या साडे 17 वर्षापासून चुलत आजोबा नातीला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार करत होता. इतकेचं नव्हे तर शेजारच्या महिलेने देखील त्याच फोटोच्या आधारावर पीड़ित मुलीला ब्लॅकमेल केलंय. अन् एका तरुणांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलंय. हा प्रकार सलग काही दिवस सुरूच राहीला, त्यानंतर ती गर्भवती ठरली. सद्यस्थितीत मुलगी 19 वर्ष रनिंग असून 9 महिन्याची गर्भवती आहे. या प्रकरणात खदान पोलिसांनी तीन लोकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केलाय.

खदान पोलीस स्टेशन हद्दीतील युसूफ खदान भागातील एका 17 वर्षे मुलीवर झालेल्या अत्याचाराच अत्यंत धक्कादायक आणि भंयकर प्रकरण आहे. खदान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अल्पवयीन असताना तिच्या 50 वर्षीय चुलत आजोबानं आंघोळ करताना तिचे काही फोटो काढले होते. त्यानंतर आजोबांना तिला कारमध्ये नेत ब्लॅकमेल करत फोटो वायरल करण्याची धमकी दिली, आणि बळजबरी तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केलेत. अनेकदा तिच्यावर आजोबाकडून अत्याचार झाला. इतकेचं नव्हे तर शेजारच्या एका 40 वर्षीय गुड्डी नामक महिलेनेही त्याच फोटोच्या आधारावर तिला ब्लॅकमेल केलंय. आणि एका 23 वर्षे तरुणासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायला भाग पाडलं. अकोला शहरातीलच मलकापूर आणि काही ठिकाणी तिच्यावर शारीरिक अत्याचार झाला. जवळपास एक ते दीड वर्ष हा प्रकार सुरूच राहिला. या दरम्यान मुलगी गर्भवती राहिली आणि याची माहिती कुटुंबीयांना समजली. मुलीचं म्हणणं ऐकल्यानंतर कुटुंबीय देखील भयभीत झालंय. त्यानंतर तिला अत्याचार करण्यासाठी महिलेनं आणि आजोबाकडून आणखी दबाव सुरूच होता. अखेर कुटुंबियांनी खदान पोलीस स्टेशन गाठलं आणि संपूर्ण प्रकरण पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी तातडीने प्रकरण गांभीर्याने घेत यात सादिक, अफरोज आणि गुड्डी नामक।महिलेविरुद्ध 354, 354(अ), 354(क), 354(ड), 452, 342, 376(2), (n), 504, 506,34 नूसार R/W कलम 4,6,8 बाल संरक्षण कायदा अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. सद्यस्थित पोलिस अत्याचार करणाऱ्या चुलत आजोबा आणि एका 23 वर्षे तरुणाचा शोध घेत आहे. तर ब्लॅकमेल करणाऱ्या महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान याप्रकरणी अधिक तपास खदान पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात सुरुये. विशेष म्हणजे ब्लॅकमेल करणारी महिला आणि अत्याचार करणारा चुलत आजोबा यांची चांगली ओळख असल्याच समजते.

मुलगी ठरली 9 महिन्याची गर्भवती-

आजोबा आणि नात यांचे नाते म्हणजे अत्यंत प्रेमाचे, आपुलकीचे आपलेपणाचे असते. मात्र याच नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार म्हणावा लागणार. अत्याचार दरम्यान मुलगी गर्भवती राहिली, सद्यस्थितीत अल्पवयीन मुलगी 18 वर्षाची असून ती 9 महिन्याची गर्भवती आहे. या सगळ्या प्रकामारामुळे संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

‘त्या’ महिलेकडून सातत्यानं दबाव आणि धमकी-

याबाबत कोणालाही काहीही सांगितल्यास पीड़ितीची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली. त्यावर दोन महिन्यानंतर फिर्यादीची मोठी बहीण घरी आली असता बहिणीला सर्व प्रकार सांगितला. परंतु बदनामीचे भीतीमुळे आई-वडिलांनी तिला बहिणी सोबत बाहेरगावी पाठवून दिले होते. मात्र मुलगी गर्भवती राहिल्यानं कुटुंबियांना तक्रार न करण्यासाठी जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी सातत्यानं येत होती.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: