Akola : दहीहंडा दि. १७ (प्रतिनिधी) : आगामी लोकसभा निवडणूक सण उत्सवाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी. तसेच समाज कंटकांवर व गुन्हेगारांवर वचक राहून, निवडणुका व उत्सव भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात याकरिता आज सायंकाळी दहीहंडा पोलीस विभागाने संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल गावातून रुट मार्च करून सन-उत्सवांमध्ये गोंधळ घालण्याचा विचार असणार्यांना चांगलीच समज दिली आहे.
सण उत्सवातील मिरवणुकीतील मोठा जनसमुदाय आणि आगामी निवडणुक लक्षात घेता या दरम्यान कोणी समाज कंटक अशांतता निर्माण करण्याची शक्यता असते. याच दृष्टीकोनातून अशी अशांतता निर्माण करणार्यांना समज द्यावी म्हणूनच पोलीस विभागाने आज रुट मार्चचे आयोजन केले होते. रेल गावातील महादेव संस्थान ते गावातील विविध मोहल्ल्यातून मज्जिद परिसरात हा रूट मार्च घेण्यात आला. या पोलीस रूट मार्च दरम्यान दहीहंडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार पुरुषोत्तम ठाकरे यांच्यासह , पोलीस उपनिरीक्षक , १३ अंमलदार , १३ होमगार्ड अंमलदार, १ एसआरपीएफ पोलीस निरीक्षक, २ एसआरपीएफ पोलीस उप निरीक्षक, ४४ एसआरपीएफ अंमलदार,
आरसीपी क्रमांक १ चे २० अंमलदार या रुट मार्च मध्ये सामील झाले होते.