Akola : अकोला येथील सदन कास्तकार तसेच काँग्रेस प्रदेश सचिव प्रशांत विश्वासराव गावंडे यांची काँग्रेस प्रदेश सचिव पदावरून हकालपट्टी केली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रशांत गावंडे यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबीत करण्यात आले आहे अशी माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.