अकोला – संतोषकुमार गवई
अकोला – बकरी ईद हा सण सोमवार दि. १७ जून रोजी साजरा होणार आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विविध बाबींचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक झाली. जिल्ह्यात सण शांतता व सुव्यवस्थेत साजरा व्हावा. कुठेही अवैध वाहतूक किंवा अवैध कत्तल व कायद्याचे उल्लंघन होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. त्यासाठी पोलीस, परिवहन व पशुसंवर्धन विभागाने एकत्रित पथके स्थापन करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. कुंभार यांनी दिले.
जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम १२५ ई च्या तरतुदीनुसार वाहनाच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करून वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना मिळविणे आवश्यक आहे. वाहतुकीपूर्वी नजीकच्या पशुवैद्यकांकडून जनावरांचे स्वास्थ तपासणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे तसेच पशु चिकित्सालय यांचे कडून जनावरांचे वाहतूक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच महाराष्ट्र मोटार वाहन नियम २०१४ मधील नियम क्र.८३ प्रमाणे जनावरांची वाहतूक होणे आवश्यक आहे,
अशी माहिती पशुसंवर्धन विभागातर्फे देण्यात आली. प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, सहाय्यक पोलीस अधीक्षक गोकुळ रामजी , मनपा उपायुक्त गीता ठाकरे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे महेश भिवापूरकर, परिवहन विभागाचे संदीप तायडे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेंद्र अरबट, डॉ. अशोक गवळी, पशुधन विकास अधिकारी डॉ कोमल काळे, डॉ. मोहन साठे , डॉ. गोकुळ खंडेलवाल, पीएसआय जी. डी. जाधव आदी उपस्थित होते.