Monday, June 24, 2024
spot_img
Homeराज्यअजित पवार गटाकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा ओघ, ही जयंत पाटलांच्या दुर्लक्षाची रिएक्शन -...

अजित पवार गटाकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा ओघ, ही जयंत पाटलांच्या दुर्लक्षाची रिएक्शन – शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे…

सांगली – ज्योती मोरे.

राष्ट्रवादी पक्षातील सांगली जिल्ह्यातील लोक शहर जिल्हाध्यक्षांवर नाराज असल्याने त्यांना पर्याय पाहिजे होता, तो पर्याय आम्ही दिला आहे.सगळे लोक आमच्याबरोबर आहेत, कार्यकर्त्यांशी कसं वागायचे, त्याची कामे कशी करायची हे त्यांना आजही कळलेले नाही. याकडे जयंत पाटलांनी दुर्लक्ष केले याची ही रिएक्शन आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश कार्यकर्ते हे अजितदादा पवार यांच्या गटाकडे गेले, असून आणखी अनेक जण येणाऱ्या काही दिवसात अजितदादा पवार गटामध्ये सामील होतील.

दरम्यान, राष्ट्रवादीतील एकही कार्यकर्ता असा नाही की तो नाराज नाही त्याला मिळणारी ट्रीटमेंट ही वरिष्ठांनी चांगल्या प्रकारे न दिल्याने हे घडले असल्याची प्रतिक्रिया अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे यावेळी माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनीही वरिष्ठान वर निशाणा साधला आहे.

Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: