Saturday, July 27, 2024
spot_img
Homeमनोरंजन'सोंग्या' मधून अजिंक्य लक्षवेधी भूमिकेत...

‘सोंग्या’ मधून अजिंक्य लक्षवेधी भूमिकेत…

गणेश तळेकर

नाटक-मालिकेतील लाडका चेहरा अभिनेता अजिंक्य ननावरे आता आपल्या डॅशिंग अंदाजात मोठा पडदासुद्धा गाजवायला सज्ज झाला आहे. ‘सोंग्या’ या चित्रपटात अजिंक्य प्रमुख भूमिकेत दिसणार असून यशराज ही त्याची भूमिका चित्रपटाला कलाटणी देणारी आहे.

निरामि फिल्म्स प्रस्तुत ‘सोंग्या’ चित्रपट येत्या १५ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाची निर्मिती मिलिंद इनामदार, निशांत काकिर्डे, राहुल पाटील यांनी केली असून दिग्दर्शन मिलिंद इनामदार यांचे आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर अजिंक्यने आजवर अनेक नाटक-मालिका तसेच चित्रपटातही काम केले आहे पण ‘सोंग्या’ मधून अजिंक्य प्रथमच मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहे. समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात अजिंक्यने साकारलेला यशराज हा उच्चशिक्षित असून देखील कुटुंबाची मानमर्यादा आणि समाज यांच्या जाळ्यात कसा अडकत जातो याचं उत्तम दर्शन घडवतो.

वडिलांच्या प्रतिष्ठेपुढे नमतं घेणारा यशराज साकारताना, ”आजही अशा कुप्रथा अस्तित्वात आहेत आणि त्यात असंख्य निरपराधांचा बळी जातोय हे समजल्यावर खरंतर मला धक्काच बसला आणि म्हणूनच मी या चित्रपटाचा भाग होण्याचा निर्णय घेतला. अशा चित्रपटाच्या माध्यमातून आपण जनजागृती घडवणं ही काळाची गरज आहे” असं अजिंक्य सांगतो.

कुप्रथांना वाचा फोडणाऱ्या एका संवेदनशील विषयवार भाष्य करणाऱ्या ‘सोंग्या’ या चित्रपटात अजिंक्य ननावरेला ऋतुजा बागवे, गणेश यादव, अनिल गवस यांची साथ लाभली आहे आणि त्याचबरोबर योगेश चिकटगावकर, दिपाली जाधव, अमोल भोसले, अपर्णा काकिर्डे, वैशाली जाधव, श्रद्धा धामणकर, प्रदीप सरवदे, प्रदीप डोईफोडे, आशिष शिर्के आदी कलाकारांच्या देखील यात भूमिका पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाची कथा-पटकथा दिपक यादव यांची आहे तर गीतलेखन गुरु ठाकूर यांनी केले आहे. संगीत विजय गवंडे यांचे आहे. आदर्श शिंदे, स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, योगेश चिकटगावकर, स्वप्नजा लेले, अमिता घूगरी यांचा स्वरसाज चित्रपटातील गीतांना लाभला आहे. छायांकन अरविंद कुमार तर संकलन निलेश गावंड यांचे आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: