आकोट – संजय आठवले
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, माजी आमदार संजय गावंडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, महिला आघाडी जिल्हा संघटिका माया म्हैसने, शिवसेना, जिल्हा समन्वयक शाम गावंडे,
तालुका प्रमुख ब्रम्हा पांडे, विधानसभा संघटक विक्रम जायले, शिवसेना शहरप्रमुख अमोल पालेकर, शिवसेना शहर संघटक सुनील रंधे यांचे नेतृत्वात उपविभागीय कार्यालय आकोट येथे शिवसेना आकोट तालुक्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलन शेतकऱ्यांना बियाणे व रासायनिक खते लवकरात लवकर मिळावीत तसेच विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी नॉन क्रिमिलेयर व जात प्रमाणपत्रे लवकरात लवकर मिळावीत याकरिता उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता हा मोर्चा आकोट तालूका कृषी कार्यालयावर गेला.परंतु कार्यालयात कृषी अधिकारी व एकही कर्मचारी उपस्थित नव्हता.
त्यामुळे शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. परिणामी कृषी विभागाचा निषेध करित पदाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांचे खुर्चीला चपलांचा हार लटकविला. सोबतच प्रशासनाला जागे करणेकरिता डफडे वाजवून ठिय्या आंदोलनही करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य डॉ. प्रशांत अढाऊ, राजू मोरे, जगन निचळ,,पं.स.सदस्य सुरज गणभोज, मुरली खोटे, सुभाष सुरत्ने, रोशन पर्वतकर,
राहुल पाचडे, नंदु बोन्द्रे, रमेश खिरकर, धीरज गीते सरपंच, उमेश आवारे, दिवाकर भगत, विजय ढेपे, प्रथमेश बोरोडे, संजय रेळे, योगेश सुरत्ने, रमेश सोनोने, राजू सोनोने, अमोल बदरखे, नितीन कोल्हे, गोपाल कावरे, सोपान साबळे, प्रशांत येऊल, विलास ठाकरे, किशोर आवारे, सरपंच शुभम मैसने, मंगेश चौधरी, देवा मोरे, अजय काळे, गणेश चंडालिया,
गोलु खलोकर, प्रफुल्ल बोरकुटे, मुन्ना चोधरी, अमोल तायडे, विकी जायले, संतोष ठाकरे, योगेश बरेठिया, आशिष जायले, प्रणव चोरे, योगेश वडतकर, स्वप्नील चौधरी, शुभम वडणे, अजय काळे, रतन कोल्हे, अश्विन चौधरी, संतोष इप्पर, सोपान पांडे, अक्षय बोडले, बाबाराव सोनोने, नितिन देवकर, रमेश कोरे लावा,
विकास जयस्वाल, अनिल डोबाळे, प्रभू मेंढे, अतुल मेंढे अमोल भारंभे, शाम रोहनकर, प्रकाश गावंडे, यश पांगारकर, शुभम वडजे, रोशन ढोले, अविनाश नाथे, अमोल तायडे, भानुदास गवई, राम अढाऊ, अश्विन डोंगरे यांच्यासह आकोट तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.