Monday, December 23, 2024
Homeराज्यकर्मचाऱ्यांच्या मनमानी मुळे गुरुद्वारा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय - प्रशासक डॉ. विजय...

कर्मचाऱ्यांच्या मनमानी मुळे गुरुद्वारा दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय – प्रशासक डॉ. विजय सतबिरसिंघ यांच्याकडे जगदिपसिंघ नंबरदार यांची तक्रार…

नांदेड – महेंद्र गायकवाड

जगभरातुन सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी व होला-मोहल्ला कार्यक्रमला लाखो भाविक येत असतात. त्यांच्या राहण्यासाठी गुरुद्वारात प्रशासनाने यात्री निवासांची सुविधा उपलब्ध केली आहे.

परंतु येथे ठाण मांडून राहिलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत असल्याची तक्रार स. जगदिपसिंघ नंबरदार यांनी गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.विजय सतबिरसिंघ यांच्याकडे केली आहे.

जगभरात प्रसिध्द असलेले सचखंड गुरुद्वारा दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात त्यांच्या राहण्यासाठी गुरुद्वारा बोर्ड प्रशासनाने यात्री निवासांच्या माध्यमातुन मोठी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. गुरुद्वारा बोर्डाच्या वतीने पंजाब भवन यात्री निवास, एनआरआय यात्री निवास, अंगद जी यात्री निवास, एसजीपीसी यात्री निवास, ग्रंथ साहेब भवन,

गुरुद्वारा परिसर, भाई दयासिंगजी यात्री निवास, बाबा मोनीजी यात्री निवास व रामदासजी यात्री निवासच्या माध्यमातुन सुमारे 700 ते 800 रुम उपलब्ध आहेत. गुरुविंदसिंघ बावा, मुंबई यांचे पंजाब भवन मध्ये 100 कमरे बुक असतात आणि अंगद देवजी यात्री निवास व एसजीपीस यात्री निवास हि त्यांच्या कडे बुक असते.

ईतके रुम त्यांना देण्यात येईल तर दुसरे येणाऱ्या यात्रेकरुंना रुम भेटत नाही. त्यांना त्रास सहन करावा लागतो. हे विचार करणे योग्य आहे. परंतु येणाऱ्या भाविकांना यात्री निवासांमध्ये मागील चार ते पाच वर्षापासुन ठाण मांडुन राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या मनमानीमुळे रुम उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत असल्याने भाविकांना खाजगी लॉज व हॉटेलचा महागडा पर्याय निवडावा लागत आहे.

दिर्घ काळापासुन ठाण मांडुन राहिलेल्या कर्मचारी यात्री निवासांमध्ये बोगस नावाने बुकिंग करुन रुम अडवुन ठेवत असून आलेल्या नवीन भाविकांना रुम उपलब्ध नसल्याचे सांगुन अडवणुक करीत आहेत.असे नंबरदार यांनी म्हण्टले आहे.

वरिष्ठ कर्मचाऱ्यांना डावलून जुने कर्मचारी यांना यात्री निवासचे ईन्चार्ज बनवुन बसवीले आहेत आणि ज्या यात्री निवास कर्मचाऱ्यांची बदली होवुन गेले ते कर्मचारी शिफारस लावून पून्हा यात्री निवास मध्ये बदली करुन घेतात.

त्यांच्या बद्दलही विचार करणे योग्य आहे. अशा यांच्या या वागण्यामुळे गुरुद्वारा प्रशासकाची बदनामी होत आहे. असे या निवेदना मध्ये नंबरदार यांनी म्हण्टले आहे.

Mahendra Gaikwad
Mahendra Gaikwadhttp://mahavoicenews.com
Mahendra Gaikwad महेंद्र गायकवाड, पाटबंधारे नगर तरोडा (बु) नांदेड, मी गेल्या वीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात असून आजपर्यंत राजकीय, सामाजिक, क्राईम, अनेक विषयावर वृत्त लेखण केले आहे. अनेक पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: