Saturday, July 13, 2024
spot_img
HomeAutoक्वांटम एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलत; किंमती १० टक्क्यांनी कमी...

क्वांटम एनर्जीची इलेक्ट्रिक स्कूटरवर सवलत; किंमती १० टक्क्यांनी कमी…

इलेक्ट्रिक स्कूटरची रचना, विकास आणि उत्पादनात विशेषज्ञ असलेले अग्रगण्य इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप, क्वांटम एनर्जी तिच्या नवीनतम इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल्स, प्लाझ्मा एक्स आणि एक्सआरवर मर्यादित कालावधीसाठी ऑफर जाहीर करण्यास रोमांचित होत आहे.

पर्यावरणास अनुकूल अशा परिवहन उपायांच्या वाढत्या मागणीला प्रतिसाद म्हणून क्वांटम एनर्जीने प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर मॉडेलच्या किंमती १० टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी एक्स-शोरूम १,१९,५२५ रुपये आणि ९९,७५७ रुपये किंमती असलेल्या प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर आता अनुक्रमे १०९,००० आणि ८९,००० रुपयांच्या मोहक किंमतीत खरेदी केल्या जाऊ शकतात. ही अप्रतिम ऑफर ३१ मार्च २०२४ पर्यंत वैध आहे.

प्लाझ्मा एक्स आणि एक्सआर इलेक्ट्रिक स्कूटर्स, पर्यावरणीय टिकाऊपणाला प्राधान्य देत असतानाच, रायडिंगचा एक अखंड आणि आरामदायक अनुभव पुरवण्यासाठी निर्माण केल्या गेल्या आहेत. शक्तिशाली १५०० डब्ल्यू मोटर आणि ६० व्ही ५० एएच लिथियम – आयन बॅटरीसह सुसज्ज असलेली प्लाझ्मा एक्स, कमाल ६५ कि.मी./तास वेग आणि ११० कि.मी.च्या प्रभावी श्रेणीसह केवळ ७.५ सेकंदात ० ते ४० कि.मी./तास पर्यंत जलद प्रवेग (रॅपिड अॅक्सिलिरेशन) प्राप्त करते.

याव्यतिरिक्त, कीलेस स्टार्ट आणि रिव्हर्स गिअर वैशिष्ट्यांच्या अतिरिक्त सोयीसह, रायडर्स, इको आणि स्पोर्ट्स या दोन ड्राइव्ह पद्धतींमधून निवड करू शकतात. १५०० डब्ल्यू मोटरद्वारे समर्थित असलेली प्लाझ्मा एक्सआर, ६० कि.मी./ताशीची सर्वोच्च गती आणि एकाच चार्जवर १०० कि.मी.ची श्रेणी प्रदान करते. हे दोन्ही मॉडेल्स दैनंदिन प्रवासासाठी, महाविद्यालयीन विद्यार्थी, ऑफिसला जाणारे कर्मचारी  आणि तात्पुरत्या कामगारांसाठी समान उपयोगी आहेत.

क्वांटम एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, श्री. चक्रवर्ती सी. म्हणाले, “प्लाझ्मा मॉडेल्ससाठी आमची मर्यादित ऑफर सादर करणे हे केवळ त्यांच्या किंमती कमी करणे आणि विक्रीला चालना देण्याबद्दलच नाही; तर हे आमच्या ग्राहकांना क्वांटम एनर्जीसह शोधाच्या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आमंत्रण देण्याबद्दलही आहे.

आम्ही ही अशी संधी सादर करताना रोमांचित झालो आहोत, ज्यामुळे ग्राहकांना आमच्या प्लाझ्मा मॉडेल्सचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अतुलनीय कामगिरीचा अनुभव घेता येईल. मला विश्वास आहे की, जे आमच्या प्लाझ्मा मॉडेल्सचा खऱ्या अर्थाने स्वीकार करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या चेहऱ्यावर ते मोठे हसू निर्माण करतील. 

आमच्या निष्ठावंत समर्थकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि क्वांटम एनर्जीच्या कुटुंबात नवीन शौकिनांचे स्वागत करण्याची ही आमची पद्धत आहे.” इच्छुक खरेदीदार, क्वांटम एनर्जीच्या वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन चाचणी राईड शेड्यूल करू शकतात किंवा संपूर्ण भारतभरातील तिच्या कोणत्याही शोरूमला भेट देऊ शकतात.

प्रत्येक क्वांटम एनर्जी शोरूम एक सर्वसमावेशक 3एस सुविधा म्हणून कार्य करते म्हणजे विक्री, सेवा आणि सुटे भाग साहाय्य प्रदान करते, जेणेकरून ग्राहकासाठी एक अखंड आणि समाधानकारक अनुभव सुनिश्चित केला जातो. यामुळे इलेक्ट्रिक वाहन उद्योगात ग्राहकांचे समाधान आणि उत्कृष्टतेसाठी क्वांटम एनर्जीच्या अतुलनीय वचनबद्धतेची पुष्टी होते.”

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: