Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनअभिनेता सुशांत शेलार यांची सामाजिक बांधिलकी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीची भेट...

अभिनेता सुशांत शेलार यांची सामाजिक बांधिलकी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीची भेट…

मुंबई – गणेश तळेकर

आपल्या सामाजिक कार्यातून वेगवेगळे उपक्रम राबविणारा व सर्वांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असणारा अभिनेता व कार्यकर्ता म्हणून सुशांत शेलार यांची ओळख आहे. विविध सामाजिक कामात कायम अग्रेसर असणाऱ्या सुशांत यांनी करोनाचा काळ असो अथवा चिपळूणची पूर परिस्थिती गरज असेल त्याला आपल्यापरीने मदतीचा हात दिला आहे. ‘चिरायू’च्या माध्यमातूनही त्यांनी पडद्यामागच्या अनेक कलावंतांचा सन्मान, मनोरंजन सृष्टीतील कलाकारांसाठी मराठी बॉक्स क्रिकेट लीग, वैद्यकीय मदत असे अनेक उपक्रम सुशांत यांनी राबविले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाचा सचिव आणि शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार यांनी पडद्यामागच्या कलाकारांसाठी छत्रीवाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच केले. हातावर पोट असणाऱ्या कलावंतांना काही गोष्टी परवडत नाही. असा कलावंतांना भेट म्हणून छत्री देण्याचे काम आम्ही आमच्या शिवसेना पक्षातर्फे केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गर्दर्शनातून भविष्यात अनेक चांगले स्तुत्य उपक्रम राबवण्याचा मानस सुशांत शेलार यांनी यावेळी बोलून दाखविला.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: