Monday, December 23, 2024
HomeMarathi News Todayश्रद्धा वालकर पेक्षाही खतरनाक हत्याकांड…पत्नीचे तुकडे करून कुत्र्यांच्या झुंड मध्ये फेकले…

श्रद्धा वालकर पेक्षाही खतरनाक हत्याकांड…पत्नीचे तुकडे करून कुत्र्यांच्या झुंड मध्ये फेकले…

झारखंडमध्ये ही घटना दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडापेक्षाही भयंकर पद्धतीने केल्या गेली. साहिबगंज येथील बोरिया संथाली येथील एका निर्माणाधीन अंगणवाडी केंद्राच्या मागे मानवी अवयवाचे तुकडे आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी सायंकाळी अंगणवाडी केंद्राच्या पाठीमागे एका व्यक्तीने महिलेच्या पायाचे व छातीचे कापलेले तुकडे कुत्र्याने खाताना पाहिल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पती दिलदार अन्सारी याला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?
साहिबगंजमध्ये एका व्यक्तीवर त्याची २२ वर्षीय पत्नी रुबिका पहाडी हिचे कटरने बारा तुकडे केल्याचा आरोप आहे. मयत रुबिका पहाडी ही पती दिलदार अन्सारीसोबत बेलटोला येथे प्रेमविवाह करून राहात होती. लग्नानंतर काही दिवसांनीच दिलदारचे पत्नीशी भांडण सुरू झाल्याचा आरोप आहे. अखेर भांडणाला कंटाळून त्याने खतरनाक प्लॅन केला आणि नंतर पत्नीची हत्या करून इलेक्ट्रिक कटरने तिच्या मृतदेहाचे 12 तुकडे केले. त्यानंतर अंगणवाडी केंद्राच्या मागे फेकले. रबिका ही दिलदारची दुसरी पत्नी असल्याचेही समोर आले आहे.

कुत्रे शरीराचा तुटलेला भाग ओढत होते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी संध्याकाळी 6 वाजता बोरियो पोलीस स्टेशन हद्दीतील संथाली मोमीन टोला येथे असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या मागे 12 तुकड्यांमध्ये महिलेचा विकृत मृतदेह सापडला. शरीराचा छिन्नविछिन्न भाग कुत्रे ओढत असल्याचे सांगण्यात आले, त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आणि पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर पोलिसांचा ताफा मोठ्या फौजफाट्यासह दाखल झाला. यावेळी श्वानपथकही त्यांच्यासोबत होते.

आफताबने दिल्लीत श्रद्धाला असाच वेदनादायक मृत्यू दिला
विशेष म्हणजे, दिल्लीतील छतरपूर भागात भाड्याच्या घरात राहणाऱ्या आफताब पूनावाला याने भांडणानंतर प्रेयसी श्रद्धाची निर्घृण हत्या केली. यानंतर त्यांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि ते तुकडे फ्रीजरमध्ये 18 दिवस ठेवले. तो हळूहळू मृतदेहाचे तुकडे जंगलात फेकत राहिला. या चिमुकलीच्या हत्येचा तपास सध्या सुरू आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: