न्युज डेस्क : तामिळनाडूतील कन्नूरमध्ये भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. कुन्नूरजवळील मारापलम येथे पर्यटकांची बस दरीत कोसळल्याने ३५ जण जखमी झाले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती येतआहे. उटीहून मेट्टुपालयमला जाणाऱ्या बसमध्ये ५५ पर्यटक प्रवास करत होते. जखमींना उपचारासाठी कुन्नूरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कुन्नूरजवळील मारापलम येथे घडली. बस उटीहून मेट्टुपालयमला जात होती. जखमींना उपचारासाठी कुन्नूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोईम्बतूर झोनचे डीआयजी सरवण सुंदर यांनी पुष्टी केली की आठ जणांचा मृत्यू झाला आहे, तर काही गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये चार महिला आणि एका अल्पवयीनाचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, मृत तेनकासी जिल्ह्यातील कदायम येथील रहिवासी असून ही घटना घडली तेव्हा ते घरी परतत होते. पुढील तपास सुरू आहे.
#WATCH | 35 people were injured as a tourist bus fell into a gorge near Marapalam near Coonoor. 55 tourists were travelling in the bus going from Ooty to Mettupalayam. The injured have been sent to Coonoor government hospital for treatment. Further details awaited. pic.twitter.com/hQNygNfoGw
— ANI (@ANI) September 30, 2023