Saturday, November 23, 2024
HomeMarathi News TodayAnti-Hijab Protests | इराणमध्ये असाही निषेध…इराणी मुली भररस्त्यावर फेकत आहेत मौलवींच्या डोक्यावरील...

Anti-Hijab Protests | इराणमध्ये असाही निषेध…इराणी मुली भररस्त्यावर फेकत आहेत मौलवींच्या डोक्यावरील पगड्या…व्हिडिओ व्हायरल…

Anti-Hijab Protests : इराणमध्ये हिजाबविरोधी महिलांचे निदर्शने सुरू आहेत. 22 वर्षीय महसा अमिनीच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या निदर्शनांमध्ये अनेकांचा बळी गेला आहे आणि इराण सरकारने त्यांना तुरुंगात टाकले आहे, परंतु निदर्शने थांबण्याचे नाव घेत नाहीत. एवढेच नव्हे तर आता इराणमधील हिजाबविरोधी निदर्शने नवे वळण घेत आहेत. आंदोलक आता हिजाब समर्थक मौलवींना लक्ष्य करत आहेत. तरुण इराणी स्त्रिया मौलवींच्या डोक्यावरून पगड्या काढताना दिसत आहेत. त्याचा व्हिडिओ बनवून शेअरही करत आहे.

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत ज्यामध्ये शाळकरी मुली आणि मुले मौलवींच्या पगड्या काढताना दिसतात. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती तरुणी रिकाम्या रस्त्यावर चालत असलेल्या मौलवीच्या मागे धावत येते आणि त्याची पगडी फेकून देते. मुलगी पगडी काढल्यानंतर लगेच पळून जाते आणि मौलवी मागे वळून आपली पगडी उचलताना दिसतो. व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे की, सरकारने शेकडो निरपराध आंदोलकांना मारल्यानंतर मौलवींच्या पगड्या काढणे ही निषेधाची नवी पद्धत बनली आहे.

दुसऱ्या व्हिडिओमध्ये मौलवी रस्त्याच्या मधोमध आपली पगडी उचलताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना लोक लिहित आहेत की, आता या मौलवींच्या पगड्या काढणे हे तरुण इराणी आंदोलकांचे रोजचे काम झाले आहे. अलिनजाद मसिह नावाची मुलगी म्हणते, “जर आम्ही जबरदस्तीने हिजाब घालण्यास नकार दिला तर हे इराणी मुल्ला आमचा शिरच्छेद करतात. त्यामुळे आमचा राग दाखवण्यासाठी आम्ही त्यांच्या पगड्या उतरवत आहोत.” डेली टेलीग्राफचा हवाला देऊन, द स्टफने वृत्त दिले आहे की “मौलवींना सार्वजनिक ठिकाणी अपमानित होण्याची भीती वाटते आणि या भीतीमुळे ते आता सार्वजनिक ठिकाणी पगडी आणि झगा घालण्याचे टाळत आहेत.”

विशेष म्हणजे 16 सप्टेंबर रोजी पोलीस कोठडीत 22 वर्षीय मेहसा अमिनीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात निदर्शने झाली. महिलांसाठी इराणच्या कठोर ड्रेस कोडचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अमिनी यांना ताब्यात घेण्यात आले. तथापि, निदर्शने सुरुवातीला इराणमध्ये हिजाब परिधान अनिवार्य करण्यावर केंद्रित होते. निदर्शने नंतर वाढली आणि 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर सत्ताधारी राजवटीसमोरील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक बनली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: