Friday, November 22, 2024
Homeराज्यमुंबई गोवा महामार्गावर सरकार अजून किती रक्ताचे सडे आणि मृत्यूंचा तांडव पाहणार..?

मुंबई गोवा महामार्गावर सरकार अजून किती रक्ताचे सडे आणि मृत्यूंचा तांडव पाहणार..?

गणेश तळेकर

12 वर्षे झाली ना चौपदरीकरण झाले, ना रस्त्यावरील खड्डे भरले गेले. मुंबई -गोवा महामार्ग पुन्हा मृत्यूचा सापळा बनलाय…9 महिन्यात 49 जणांचा या रस्त्याने बळी घेतला तर शेकडो प्रवासी अपघातात जखमी झालेत!

सरकार मध्ये असले की दुर्लक्ष करतात.. सत्तेबाहेर आले की बोंबा मारतात… रखडलेला मुंबई – गोवा हायवे हा सर्वच राजकीय पक्षांचा पाप! निर्दयी सरकार आणि निर्दयी विरोधी पक्षांच्या नाकर्तेपणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असल्याने

महामार्गाच्या चौपदरीकरणास झालेला विलंब आणि यामार्गाचे झालेल्या दुरावस्थेच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख व किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा प्रेस क्लब तर्फे 9 नोव्हेंबरला कोलाड नाका येथे रस्त्यावरील प्रवासी वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण न करता “मानवी साखळी आंदोलन” करण्याचा निश्चय केला आहे.

बुधवार दि. 9 नोव्हेंबरला सकाळी 10.30 वाजता कोलाड नाका येथे आम्ही येतोय.. तुम्हीही या.. कारण या महामार्गावर अपघाती बळी गेलेले आणि गंभीर जखमी झालेले शेकडो जन आपलेच कोणीतरी आहेत..!

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: