अकोला शहरातील भर चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुखाची हत्या झाल्याने अवघ्या शहरात खळबळ उडाली होती. या हत्ये प्रकरणी रामदास पेठ पोलिसांनी अवघ्या दोन तासाच्या आतच दोन आरोपींना अटक करण्यात यश आले असून हत्येचं कारणही समोर आल आहे.
अकोला जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास अकोल्यातील रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील जठारपेठ चौकात भर सायंकाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतील उपशहर प्रमुख विशाल रमेश कपले यांच्यावर दोन अज्ञात लोकांनी चाकू हल्ला केला या घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विशालला परिसरातील नागरिकांनी तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी विशाल कपले यास मृतक घोषित केले.
या आरोपीनी विशालवर एकामागून एक सात वार केल्याने विशालचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता मात्र विशाल याला खाजगी दवाखान्यात नेण्यात आले होते, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.ही हत्या करणाऱ्यांमध्ये दोन जणांचा समावेश असून हे दोघेही मोठी उमरी परिसरातील रहिवासी असल्याचं रामदास पेठ पोलिसांना समजताच रामदास पेठ पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षका मोनिका राऊत अकोला शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक आरोपींना पकडण्या करिता रवाना केले असता या पथकाने या हत्येतील दोन आरोपींना दोन तासाच्या आत कारंजा येथून अटक केली.
सदर हत्ये प्रकरणी विविध तर्क वितर्क लावले जात असतांनाच 10 दिवसा पूर्वी झालेल्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी आरोपी 23 वर्षीय शिवानंद मनोहर दोरवेकर व 22 वर्षीय विनोद रमेश कांबळे दोघेही राहणार महाकाली मंदिर मोठी उमरी यांनी ही हत्या केल्याची कबुली दिली.