अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या आशियाड कॉलनी परिसरातील संमती शिक्षक कॉलनीतील घरात अभियंता मुलीसह आईचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. सदर घटना काल रात्री मंगळवारी (दि. २५) रात्री दहाच्या सुमारास समोर आली. प्रथमदर्शनीही आत्महत्या असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.सुवर्णा प्रदीप वानखडे (५१)आणि मृणाल प्रदीप वानखडे (२५)असे मृत आई व मुलीचे नाव आहे.
अमरावती येथील शिक्षक कॉलनीत राहणारे प्रदीप वानखडे हे शिक्षक असून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील एका शाळेत कार्यरत आहेत. प्रदीप हे घाटंजीला राहतात तर मुलगी मृणाल व सुवर्णा या दोघी मायलेकी एकत्र राहत होत्या. सहा महिन्यांपूर्वी मृणालचा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत अभियंता म्हणून नोकरीवर लागली होती, तर सुवर्णा शहरातील एका खासगी शाळेत नोकरीवर असल्याची माहिती मिळाली आहे.
शिक्षक संमती कॉलनीपासून जवळच असलेल्या हनुमानमंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी एकाला सोन्याचे दागिने व काही रोकड पडल्याचे दिसल्याने याबाबत पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली, सदर माहिती विवेकानंद कॉलनीतील आखरे यांना दिली. सदर दागिने पाहिल्यानंतर ते दागिने सुवर्णा वानखडे यांचेअसल्याचे आखरे यांनी ओळखले.डॉ. आखरे हे सुवर्णा वानखडे यांचे भाऊ आहेत. हनुमान मंदिराजवळसुमारे दीडशे ग्रॅम सोन्याचे दागिने व पावणे दोन लाख रुपये रोख होती.
संशय वाढल्यामुळे पोलिसांसह डॉ. आखरे हे वानखडे यांच्याघरी पोहोचले. पोलिसांनी वानखडे यांच्या घराबाहेरून बरेच आवाज दिले मात्र प्रतिसाद येत नव्हता. पोलिसांनी नातेवाइकांच्या उपस्थितीत दरवाजा तोडला आणि घरात प्रवेश केला असता घरातील हॉलमध्ये सुवर्णा आणि मृणाल यांचे मृतदेह दोन पंख्याला लटकलेले दिसून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसउपायुक्त विक्रम साळी, एसीपीदत्तात्रय ढोले, गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले पीएसआयपंकज ढोके यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलिस ताफा घटनास्थळी दाखल झाला होता.