टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने गतवर्षी वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेतला. साहसाची परिसीमा ओलांडलेल्या या सामन्यात माजी कर्णधार विराट कोहलीने टीम इंडियासाठी 53 चेंडूत नाबाद 82 धावांची खेळी केली. रविचंद्रन अश्विनने शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.
कोहलीशिवाय हार्दिक पांड्याने 37 चेंडूत 40 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 15 धावांचे योगदान दिले. या तिघांशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा पार करता आला नाही. रोहित शर्मा आणि केएल राहुलने प्रत्येकी चार धावा केल्या. अक्षर पटेलने दोन धावा केल्या. दिनेश कार्तिकला केवळ एक धाव करता आली. अश्विन एका धावेवर नाबाद राहिला. कोहली आणि हार्दिकने 113 धावांची भागीदारी केली. या भागीदारीने संघाला विजयाच्या जवळ नेले. गोलंदाजीत भारताकडून अर्शदीप सिंग आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी तीन बळी घेतले.
टीम इंडियाला विजय मिळवून दिल्यानंतर विराट कोहलीने आपल्या अंदाजात चाहत्यांचे आभार मानले, यावेळी आयसीसी ने विराटच्या हा videot ट्विटरला शेयर केला आहे.