नरखेड – अरविंद बाबूदेशमुख महाविद्यालय भारसिंगी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम नागपूर आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय मानसिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश पवार सर उपस्थित होते.
तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून मानसिक आरोग्य केंद्र नागपूर येथील डॉक्टर साकिब सर श्री प्रवीण काकडे सर श्री राजरतन दुपारे सर श्री पुण्यवान पुरी सर श्री आशिष तेटू सर तसेच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि मानसिक आरोग्य कर्मचारी श्री बादल खांडरे आणि राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष काटे सर तसेच जयंती पुण्यतिथी विभागाचे समन्वयक डॉ. दादाराव उपासे सर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर उपासे सर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सर्व पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या फोटोला हारार्पण करून करण्यात आली. आपल्या अध्यक्षिय भाषणामध्ये प्राचार्य पवार सरांनी राष्ट्रसंतांच्या विचारांचा उजाळा केला. त्यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले की राष्ट्रसंतांनी आपल्या जीवनामध्ये स्वच्छतेवर विशेष भर दिलेला होता. तर आज विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे.
डॉ. साकिब सर यांनी मानसिक रोगाची कारणे कोणती आणि त्यावर कोणकोणते उपाय करता येईल यावर विशेष भर दिला. तसेच श्री प्रवीण काकडे सर यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मानसिक रोगांना कसे सामोरे जावे याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री बादल खंडे यांनी आपल्या मिश्किलशैलीमध्ये मानसिक आरोग्याची संकल्पना स्पष्ट केली आणि उपाययोजना सांगितल्या. वरील कार्यक्रमा ला जवळपास 400 विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रसंतांच्या राष्ट्रवंदनेने झाली. वरील कार्यक्रमाला डॉ. श्रीकांत ठाकरे डॉ. नितीन राऊत प्रा. राजेंद्र घोरपडे प्रा. माहेश्वरी कोकाटे प्रा. अंकिता पावडे प्रा. अपेक्षा शिरसकर प्रा. आरती पावडे प्रा. अजय मंगल प्रा. भूषण खोडे प्रा. अनिकेत चिंचमालातपुरे प्रा. कपिल शिरसकर प्रा. हेमंत कोहळे प्रा. मिलिंद सोमकुवर प्रा. अमीन नांदगावे रसेयो सह कार्यक्रम अधिकारी अमित गद्रे इत्यादी प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. आशिष काटे सर तर आभार रासेयो सहकार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेंद्र सिनकर यांनी मानले.