रामटेक – राजू कापसे
रामटेक तालुक्यातील देवलापार परिसरात कडबिखेडा गावातील सुरज झिटू इनवाते (वर्षे) हा तरुण गावानजीकच्या परिसरात बकऱ्या चराई करत असताना अचानक जंगलातील वाघाने त्याच्यावर हल्ला चढवला आणि त्याला गंभीररित्या जखमी केले. या वाघाच्या हल्ल्याच्या घटनेमुळे कडबिखेडा, उसर्रेपार, सावरा, झिंजेरिया या अवतीभवतीच्या गावात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
तसेच जंगली प्राण्यांकडून पिकांच्या होणाऱ्या अतोनात नुकसानापासून पिकांचे बचाव करण्यासाठी आजूबाजूच्या गावातील शेतकरी शेतपिकांचे राखण करायला शेतात जाण्यास घाबरत आहेत. सुरज इनोवाते याची प्रकृती सध्या चिंताजनक असून गावातील लोकांनी जखमी इसमाच्या मदतीसाठी मोबदला आणि मानसिंगदेव सीमा अंतर्गत तारेचे कुंपण तात्काळ करण्याचे निवेदन वनपरिक्षेत्र अधिकारी, पवनी (देवलापार) यांच्याकडे देण्यात आले आहे.
यावेळी गोंगपा चे प्रदेश अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य हरिष उईके,राहुल उईके,श्रीमती कारो सुरजी इनवाते,रमेश तुमडाम,दानशु तुमडाम,महेश तुमडाम,दिपक धुर्वे,संतोष उइके,राजु वाढिवे,शिताराम वाढिवे,रेखा तुमडाम,ऊषा तुमडाम,रजनी उइके,प्रमोद मुंडेश्वर,वनिता नैताम सहित आदी उपस्थीत होते.