सांगली – ज्योती मोरे
संपूर्ण भारतात दरवर्षी 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो या स्मृतिदिनानिमित्त 1 सप्टेंबर 2021 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत कर्तव्यार्थ असताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असते आज पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे पोलीस स्मृती दिनानिमित्त, भारतातील वेगवेगळ्या राज्यातील सर्व पोलीस शहिदांना आदरांजली वाहण्यात आली त्यांचे स्मरण करून हा दिन साजरा करण्यात आला.
या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अजेय राजंदेंकर हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास पोलीस अधीक्षक दीक्षित दीक्षित गेडाम, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबुले, मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक वीरकर,गृह विभाग पोलीस मुख्यालयाचे पोलीस निरीक्षक विपिन हसबनिस,
पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, तसेच सांगली मिरज विभागातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी इतर शाखेतील प्रभारी अधिकारी व राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी पोलीस अधीक्षक कार्यालयामधील लिपिक कर्मचारी यांच्या उपस्थितीत पार पडला.
या कार्यक्रमांमध्ये 1 सप्टेंबर 2021 ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत कर्तव्यर्थ असताना शहीद झालेल्या एकूण 264 पोलीस अधिकारी व पोलीस जवानांची नावे वाचून त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन शहीद स्तंभास पुष्पकचक्र व मानवंदना देऊन शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली.