अमरावती : नॉलेज फाउंडेशन अमरावतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या एका सामाजिक उपक्रमात ग्राम आराळा ता. दर्यापूर येथील एम. पी. एस. सी. चा अभ्यास करणारा गरजू व होतकरू विद्यार्थी गजानन ठाकूर व त्याच्या मित्रांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांच्या संचाचे वाटप करण्यात आले. ह्या वेळी नॉलेज फाउंडेशन चे संस्थापक सदस्य सचिन बाकल, धर्मादाय कार्यालय अमरावतीचे अधीक्षक निलेश करलुके व सामजिक कार्यकर्ते सोपान गोंडचोर उपस्थित होते.
ज्ञात असावे की, नॉलेज फाउंडेशन ने यापूर्वी समाजातील गरजवंताना कोरोना काळात व इतरही परिस्थितीत जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करून लोकांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलवले आहे. मंगरूळ चव्हाळा येथील प्रश्न चिन्ह शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकांचे वाटप केले आहे.
वाटप केलेल्या एम पी एस सी स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा पुरेपूर लाभ घेवून गजानन ठाकूर सारख्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत यश संपादन करावे अशी सदिच्छा सचिन बाकल यांनी ह्या प्रसंगी व्यक्त केली.