Friday, November 22, 2024
Homeगुन्हेगारीअमरावती | अचलपूरच्या नायब तहसीलदारास १८ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले…अमरावती ACB...

अमरावती | अचलपूरच्या नायब तहसीलदारास १८ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले…अमरावती ACB ची कारवाई…

अमरावती : जिल्ह्यातील अचलपूर तहसील येथील लोकसेवक नायब तहसीलदारास १८ हजारांची लाच घेताना अमरावती लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर अचलपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा क्रमांक एम एच 27 बी एक्स 49 37 रेतीने भरलेला ट्रक लोकसेवक नायब तहसीलदार श्री शंकर महादेवराव श्रीराव वर्ग 2 यांनी 02-10-2022 रोजी स्थानिक महालक्ष्मी काट्याजवळ ट्रक थांबविला असता सदर ट्रक व कार्यवाही न करण्यासाठी नायब तहसीलदार यांनी तक्रारदार यांना 20 हजार लाचेची मागणी केली, मागितलेली रक्कम नंतर आणून देण्याचं अटीवर ट्रक सोडण्यात आला होता.

सदर तक्रारीचा अनुषंगाने 17-10-2022 रोजी पंचासमक्ष केलेल्या कारवाई दरम्यान आलोसे नायब तहसीलदार श्री शंकर महादेवराव श्रीराव वर्ग 2 अचलपूर तहसील यांनी तक्रारदार यांचे कडून लाचेची 18000 रक्कम नायब तहसीलदार यांचे न्यायालय कक्षेमध्ये तहसील कार्यालयात पंचासमक्ष स्वीकारली तदनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर अचलपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईसाठी, श्री विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती., श्री.अरुण सावंत, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती. व श्री. देविदास घेवारे, अप्पर पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि.अमरावती परिक्षेत्र, अमरावती. श्री संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती, श्री शिवलाल भगत, पोलीस उपअधीक्षक, अमरावती घटक, अमरावती, यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

यावेळी सापळा व तपास अधिकारी – पो. नि. प्रवीण पाटील ,ला.प्र.वी.अमरावती व कार्यवाही पथक, पो.नि अमोल कडू, पो.नि केतन मांजरे, पो.ना राहुल वंजारी ,पो.ना विनोद कुंजाम, पो.कॉं शैलेश कडू ,चालक पो.उप निरीक्षक सतीश किटूकले यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: