गोकुळ शिरगाव – राजेद्र ढाले
सत्ता हे साधन नसून गोरगरीबांच्या सर्वागीण विकासाचे प्रतिबिंब आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीस्थळाच्या सर्वागीण विकासासाठी सैदेव प्रयत्न शील असून जनतेच्या विकासाची कामे करताना कधी हार जीत होत असते. पण महाडिक कुटुंबीयांनी सत्ते साठी कधीचं राजकारण केलं नाही. जनसामान्य लोकांसाठी महाडिक कुटुंबीयांनी महापूर, कोविड, नैसर्गिक आपत्ती, गोरगरीबांना मदतीचा हात दिला आहे. असे प्रतिपादन खास. धनजंय महाडिक यांनी केले.
उचगाव (ता. करवीर) येथे भाजपा पक्ष पदाधिकारी व एन. डी. ग्रुप च्या वतीने खासदार पदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले, राजेंद्र सकपाळ, दत्तात्रय तोरसकर, सुहास पाटिल, माजी सरपंच अनिल शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. खास. महाडिक यांच्या हस्ते एन. डी. ग्रुप च्या वतीने बांधकाम कामगाराना स्मार्ट कार्ड चे वाटप करण्यात आले.तसेच
यावेळी आरोग्य जनजागृती साठी योगदान देणारे सामाजिक कार्यकर्ते मोहन सातपुते, राज्यस्तरीय मुदगल फिरवणे स्पर्धेत जयवंत पाटील व अनिता पाटील, शिक्षक पुरस्कार प्राप्त राहुल कदम, जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त पूर्वा मनकर , उचगाव ट्रॅफिक नियंत्रण साठी स्वयसेवक राजू राठोड, दिलीप कार्वेकर, रुग्णवाहिकासाठी मानवसेवा करणारे दिपक मदुगडे, रुपेश परिट, सागर मदुगडे , अविनाश माने, अर्जुन मदुगडे, रवि माने
या गुणवंतांचा खासदाराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास एन. डी. वाईगडे, अभिजित पाटील, उमेश पाटील, ग्रा. प .सदस्य विजय यादव, संगीता दळवी, कल्याणी वाईंगडे, म्हालिंग जंगम, राजेंद्र हेगडे, युवराज अडवाणी, रुपेश परिट, शिवाजी यादव, सिंकंधर सलगर, निवास यमग्रनी, संदीप कुंभार, सदाशिव पाटील, उमेश देशमुख, विक्रम मोहिते याच्या सह ग्रामस्थ, महिला, युवक, एन. डी ग्रुप चे व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विनोद थोरात यांनी सुत्र संचालन केले. ग्रा.प सदस्य रमेश वाईंगडे यांनी आभार मानले.