Friday, September 20, 2024
Homeगुन्हेगारीपिंपळगाव फाटा येथे दोन वाहनात अपघात; दोन गंभीर जखमी...

पिंपळगाव फाटा येथे दोन वाहनात अपघात; दोन गंभीर जखमी…

कागल – राहुल मेस्त्री

पिंपळगाव ता. कागल येथील पिंपळगाव फाटा म्हणून परिचित असलेल्या ठिकाणी दोन वाहनात समोरासमोर अपघात झाल्याची घटना दि. 17 रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती अशी की महेंद्र कंपनीचा नवीन ट्रॅक्टर ट्रॉली नंबर नसलेला आणि ओमनी चारचाकी वाहन (गाडी क्रमांक एम एच 20 ए एन 2553 )या दोन वाहनात येथील पिंपळगाव फाटा येथे समोरासमोर अपघात झाला.

यामध्ये ओमनी या चारचाकी वाहनातील दिनकर वासुदेव बोराटे वय. 32 आणि छाया दिनकर बोराटे दोघेही रा. व्हन्नुर ता. कागल येथील रहिवासी असून सदर अपघातामध्ये यांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे.

या अपघातामध्ये चुकीच्या पद्धतीने वाहन चालवणाऱ्या ट्रॅक्टर चालकांने अपघातातील जखमींना कोणतीही वैद्यकीय सुविधा न पुरवठा त्या ठिकानाहुध पळ काढल्याने अपघातातील जखमी दिनकर बोराटे यांनी त्यांच्याविरुद्ध कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकावर भारतीय दंड संहिता कलम प्रमाणे 279,337,338 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास कागल पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: