कोल्हापूर – राजेंद्र ढाले
उजळाईवाडी (ता. करवीर) येथील लक्ष्मीनारायण कॉलनी येथे राहणाऱ्या कांताबाई नारायण मोहिते वय ६० यांनी आपली सून राधिका श्रीरंग मोहिते तिच्याकडून अंघोळीसाठी गरम पाणी मागितल्याच्या रागातून सुनेने गरम पाण्याची बादली सासू कांताबाई यांच्या अंगावर ओतल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या.
सीपीआर रुग्णालयात उपचारादरम्यान कांताबाई यांचा दहा दिवसानंतर मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने करीत आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळाली अधिक माहिती अशी की, २१ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान कांताबाई नारायण मोहिते (वय ६० वर्ष सध्या लक्ष्मीनारायण कॉलनी उजळाईवाडी मुळ गाव अंभेरी ता. खटाव जि. सातारा) यानी आपली सून सौ राधिका श्रीरंग मोहिते हिस अंघोळी करीता गरम पाणी मागितले असता सून राधिका हिने गरम पाण्याची बादली सासू कांताबाई हिचे अंगावर ओतल्याने त्या भाजून जखमी होऊन ता. ३० सप्टेंबर रोजी मयत झाल्या.
कांताबाई यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मूळ गावी अंभेरी (ता. खटाव जि. सातारा) येथे अंत्यसंस्कारासाठी त्यांना नेण्यात आले. गोकुळ गाव पोलिसांना सदर गुन्ह्याची माहिती सी पी आर रुग्णालयाकडून मिळाल्यानंतर चौकशी केली असता नातेवाईक गावी होते.
बाबत प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मयत कांताबाई यांचे नातू ओंकार श्रीरंग मोहिते यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सासूच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल संशयित सुन राधिका यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. यातील संशयित आरोपी सून सौ राधिका मोहिते या सन २०१२ पासून प्यारानाॅईड शिझोफिनिया व्हीथ सटेबल डीफिसीट या मानसिक आजाराने ग्रस्त असून त्यांचेवर सातारा व कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत.