IND vs AUS :T20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा सहा धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 7 गडी गमावून 186 धावा केल्या. केएल राहुलने 33 चेंडूत 57 धावा आणि सूर्यकुमार यादवने 33 चेंडूत 50 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ डेथ ओव्हर्समध्ये भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाच्या बदल्यात 20 षटकांत 180 धावांवर सर्वबाद झाला.
ऑस्ट्रेलियाला शेवटच्या पाच षटकात ४३ धावांची गरज होती. तेव्हा त्याच्या आठ विकेट्स शिल्लक होत्या. फिंच आणि मॅक्सवेल फलंदाजी करत होते. यानंतर भुवनेश्वर कुमारने 16व्या षटकात केवळ चार धावा दिल्या आणि एक बळी घेतला. अश्विनने 17व्या षटकात 10 धावा दिल्या. अर्शदीप 18व्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने 13 धावा दिल्या. 19 षटक हे भारताला गेल्या काही काळापासून नेहमीच महाग ठरत आले. मात्र, या सामन्यात हर्षल पटेलने 19 वे षटक घेतले आणि केवळ पाच धावा दिल्यात. या षटकात दोन विकेटही पडल्या. हर्षलने प्रथम फिंचला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर या षटकात विराट कोहलीच्या थेट फटकेबाजीवर टीम डेव्हिड धावबाद झाला. मोहम्मद शमी 20 व्या षटकात पहिल्यांदा गोलंदाजी करायला आला. त्याला 11 धावा वाचवाव्या लागल्या. समोर पॅट कमिन्स आणि जोश इंग्लिस होते.
शमीच्या शेवटच्या षटकाचा थरार
शमीने पहिल्या चेंडूवर दोन धावा दिल्या…
दुसऱ्या चेंडूवर पुन्हा दोन धावा झाल्या…
कमिन्सने तिसऱ्या चेंडूवर शॉट खेळला. यावर कोहलीने एका हाताने सीमारेषेवर अप्रतिम झेल घेतला…
चौथ्या चेंडूवर ऍश्टन अगर धावबाद झाला…
पाचव्या चेंडूवर शमीने जोश इंग्लिसला यॉर्करवर क्लीन बोल्ड केले…
यानंतर शमीने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर केन रिचर्डसनला क्लीन बोल्ड केले…
अशाप्रकारे शमीच्या शेवटच्या चार चेंडूंवर चार विकेट पडल्या. शमीने यापैकी तीन विकेट घेतल्या आणि एक धावबाद झाला. शमीने शेवटच्या षटकात फक्त चार धावा दिल्या आणि भारताने सहा धावांनी सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार एरॉन फिंचने सर्वाधिक 76 धावा केल्या. याशिवाय मिचेल मार्शने 35 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने एक ओव्हर टाकत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
भुवनेश्वर कुमारने तीन षटकात 20 धावा देत दोन बळी घेतले. अर्शदीप सिंगने तीन षटकांत ३४ धावा दिल्या आणि एक बळी मिळवला. हर्षल पटेलने तीन षटकात 30 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. चहलने तीन षटकांत २८ धावा देत एक बळी घेतला. आता भारतीय संघ १९ ऑक्टोबरला दुसऱ्या सराव सामन्यात न्यूझीलंड संघाशी भिडणार आहे.