Friday, November 22, 2024
Homeराजकीयराष्ट्रवादीचे माजी जिल्हासचिव 'बाळासाहेबांच्या सेने'त...

राष्ट्रवादीचे माजी जिल्हासचिव ‘बाळासाहेबांच्या सेने’त…

सांगली -ज्योती मोरे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा कार्यालयीन सचिव मनोज भिसे यांनी बाळासाहेबांच्या सेनेत प्रवेश केला आहे. भिसे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. लवकरच चांगली जबाबदारी देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे, अशी माहिती भिसे यांनी दिली.

मनोज भिसे राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हा कार्यालयात जिल्हा सचिव म्हणून कार्यरत होते. काही महिन्यांपूर्वी पक्षांतर्गत वादातून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे तक्रार करूनही भिसे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सद्या ते राष्ट्रवादीपासून अलिप्तच होते. त्यांना सचिवपदातून मुक्त करण्यात आले होते.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी भिसे यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. तब्बल १५ मिनिटे शिंदे यांनी भिसे यांची विचारपूस केली. महापालिका क्षेत्रातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. लवकरच मोठी जबाबदारी देऊ, अशी ग्वाहीही शिंदे यांनी दिल्याचे भिसे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: